भाग १ वाचण्याकरिता येथे click करा.
-----------------------------------------------------------------------------------------------
![]() |
मोठी करण्यासाठी click करा |
बौंबे स्याप्पेर्स कॉलनीच्या बाहेर पडून नगर रोड ला लागलो. जवळच असलेलेल्या IDBI बँकेच्या ATM ला जाऊन पैसे काढले. अंधार अजून हि होताच सर्व जन एकामागे एक बाईक्स चालवत होळकर ब्रिज पार करून, जुन्या मुंबई-पुणे हायवे ला पायाखालून (म्हणजे बाईक्सच्या :) ) तुडवत औंध मार्गे नवीन मुंबई-पुणे हायवे ला धडकलो होतो. सुर्य सुद्धा त्याची झोप पूर्ण करून आता ढगांच्या बाल्कनीतून डोकावून पाहायला लागला होता.
गाडीची टाकी फुल्ल करायची म्हनुन ४ हि पल्सर हायवे ला असलेल्या पेट्रोल पंप ला घेतल्या. सकाळी- सकाळीच पोट खाली केल्याने पोटात कोकायला लागली होती. पेट्रोल पंप ला असलेल्या हॉटेलात सर्व घुसलो.
![]() | |
पंपावर वळण्याअगोदर (मोठे करण्यसाठी click | ) |
Boys are always Boys या उक्तीप्रमाणे सर्व जन एकमेकांना शिव्या देत मुलींबद्दल्च्या चर्चा करु लागलो- " यार कैसा group है, एक लडकी नही..सारी जींदगी बर्बाद कर दि तुम लोगो ने", हे वाक्य संपत नाही तोवर पेट्रोल पंप ल एका कार ने प्रवेश केला....
अ ग ग ग .... सर्वांच्या नजरा तिथेच अटकल्या... लाजवाब अश्या ३ पोरी चुकलो सुंदरी बाहेर पडल्या डोळ्यांवरची गॉगल्स काढत, इकडे तिकडे बघत हॉटेल मध्ये शिरल्या आणि आमच्या शेजारच्या टेबलवर बसल्या.
आतापर्यंत खुल्या रेड्या सारखी हैदोस मांडणारी पोर आता गायीसारखी शांत बसली होती. त्यांच्याकडे बघत बघत ७ लोकांनी १६-१७ वडा-पाव संपवलीत. सुंदरी निघाल्यात आणि आम्ही पण मग त्यांच्यामागे निघालो. कार असल्यामुळे ती सर्व नवीन मुंबई-पुणे हायवे वरून सुसाट निघून गेल्यात आणि आम्ही परत जुन्या मुंबई-पुणे हायवेकरिता टर्न घेतला (कारण नवीन मुंबई-पुणे हायवे वरून दुचाकींना बंदी आहे).



आता लोणावळ्यात पोहचलो होतो. सन-सेट पोईन्ट ला आम्ही सन-राईज च्या वेळेस (नंतर) पोहोचलो, आणि मग तिथे तोड वेळ TP करत फोटो काढून हौस भागवून घेतली.
उशीर होतोय म्हणून आता न थांबता निघायचं ठरलं. घाटातली वळणदार रस्ते पार करत, मजल दर मजल करत पेन गाठलं, चहा ची तलब आली म्हणून सर्वे एका टपरीवर थांबलो. चहा, सुट्टा सर्व करून घ्या म्हटला, कारण नंतर नागाव-अलिबाग पर्यंत थांबायचं नव्हत. वाटेत ISPAT industries ची मोठ्ठी factory लागते. मोठ्ठी म्हणजे भव्य... खरच.
आता वारयाची जागा घामाने घ्यायला सुरुवात केली होती. कोकणात पोहच्ल्याची हि सुरुवात होती. कोकणातल्या त्या खाऱ्या वारयापाई आता कधी एकदाचे बीच वर पोहचतो आणि कपडे काढून स्वताला पाण्यात झोकतो अस वाटायला लागल होता. आणि हा असा विचार करतच अंकेत खोत च्या घराजवळ येऊन पोहचलो. घरासमोरच बीच, फक्त मध्ये एक छोटं मैदान आणि समोर नारळाच्या झाडांची शिस्तबद्ध उभी असलेली रांग, एवढाच. inshort उत्तम असा निसर्ग खुणावत होता.
बस...सर्वे जन रूम मध्ये गेलो, फ्रेश झालो... कपडे काढलीत... हो म्हणजे काय बीच वर जायचं तर कपडे घालून जाणार??? लाल -निळ्या रंगाच्या चड्ड्या (swimming costume) घालून फौज निघाली. :)
अहाहा बीच त्याचे ते सौंदर्य, सुंदर अश्या बीचवर सुंदर मुली :) :) :) बस मुली म्हटला कि तुम्हा वचनार्यांच्या चेहर्यावर बघा कसा आनंद झळकायला लागतो, पण मी काही त्या मुलींचे वर्णन करणार नाही...
तर आता आम्ही सर्वांनी स्वताला पाण्यात झोकून दिलेले होतं. पाण्यातून बाहेर बघायला एक वेगळीच मजा येते...

विचारांच्या गर्तेत असतानाच गाडीचा वेग कमी झाला, आणि मी खाली आलो. सर्वे आता पुरते थकले होते. समोरच असलेल्या दगडावर आम्ही सर्वे जाऊन बसलो. शांत संध्याकाळ, हळुवार समुद्राच्या लाटा बघत मनातले विचार कुठल्या कुठे पळून जातात. वाटत सोडा हा यार जॉब, सोडा ह्या सर्व चिंता. नको या कटकटी, नको या जबाबदाऱ्या. शांत अश्या या बीच वर राहून आयुष्य काढावे.
![]() |
मोठे करण्यासाठी click करा |
संध्याकाळ झाली, आकाशाने आता रंगांची उधळण करायला घेतली होती. मुक्तहस्ताने तो क्षितिजाच्या कॅनवास वर रंगाची आरास मांडत होता. खूपच छान. संध्याकाळ निघून तिने रात्रीत कधी प्रेवश केला कळल सुद्धा नाही.
रूम वर गेलो, थोडा नाश्ता केला, आणि मग परत सर्व बीच वर. रात्रीला तेथे बॉन-फायर केल, खूप धमाल. प्यार भरे नगमे ओर थोडीसी यादे, बस रात्रीला रंग चढायला आणखी काय लागते. :)
खूप मस्ती करून, दमून मंडळी शांत झोपली... फार दिवसानंतर अशी झोप लागली होती.
सकाळी बीच बघायचा आहे म्हणून जाग पण आली... सकाळची हवा बीच वर घेण्यात फार सुख असत, आणि हे एकदा तरी अनुभवायला हवं. तोच अनुभव घेत, आणि नवीन अनुभव साठवत, काही फोटो काढत, भूक वाढवत आम्ही सर्वे रूम कडे परत निघालो. मस्त पैकी पोह्यांची ऑर्डर आधीच देवून ठेवली होती. त्यामुळे बीच वरून परत आल्यवर वाट बघावी लागली नाही. इतके खाऊन सुद्धा पोट भरला नाही म्हणून अंकेत ला अंडा-भुर्जी आणि पाव ची ओर्डर सोडली :). मस्त पैकी अंडा-भुर्जी खाऊन तृप्ती ची ढेकर दिली.
एक समाधान जे शोधण्यासाठी, ऑफिसला मेल्स वर ज्याची चर्चा झाली होती, आणि ज्याकरिता नागाव ला आलो होतो, ते सर्वांच्याच चेहर्यावर दिसत होतो. निघण्यापूर्वीच पुढच्या वेळेला कुठे जाता येईल याच्या planning ला पण सुरुवात झाली होती. पण offcorse मेल्स वर चर्चा झाल्याशिवाय ती पूर्ण होणार कशी? :)
आम्ही सर्व Bikers (Click on Photo) |
----------
(समाप्त )
आपल्या प्रतिक्रियेची गरज भासणार आहे. :)