Sunday, April 17, 2011

अतिरेक...उद्वेग..भावना अणि एक उड़ान

बार मधे बसून चौघांना ही जास्त चढलेली आहे. ३ सिनिअर्स अणि १ जूनियर.
त्यापैकी १ सिनिअर जूनियर ला विचारतो, "तेरा ड्रीम बिसनेस क्या है बे?" जूनियर- "मुझे राईटर बनना है."
सिनिअर्स - "राईटर... हा हा हा हा... जावेद अख्तर.. हा हा हा....अछ्छा कुछ सुना.."
जूनियर -
हर बाल की खाल की ये छाल भी खा जाये,
इस के हाथ पर जाये तो महीने साल भी खा जाये,
किसी बेहाल का जो बचा हो हाल तो हाल भी खा जाये,
बे-मौत मरते मन का ये मलाल खा जाये,
लालू का लाल खा जाये, नक्सलबारी की नाल खा जाये,
बचपन का धमाल खा जाये, बुढ़ापे की शाल भी खा जाये,
हया तो छोड़ो बेहया की चाल भी खा जाये
और अगर परोसा जा सके तो खयाल  भी खा जाये...
मागच्या १०-१२ दिवसांपासून, निखिल माझ्या मागे लागला होता की, "साले उड़ान देख, अल्टि मूवी है, ये नहीं देखा तो क्या देखा". खरे तर त्याने एवढ सांगितल्यावरच मी मूवी बघायला पाहिजे होती, (कारन तो मला ज्या मूवीज सज्जेस्ट करतो, त्या सर्वच छान असतात) पण का कुणास ठाउक मी टाळाटाळ करत होतो, हे माहित असून सुद्धा की २०११ चे फिल्मफेअर अवार्ड्स या मूवी ला मिळाले. यात बेस्ट फिल्म (क्रिटिक्स अवार्ड), बेस्ट स्टोरी,  सिनेमाटोग्राफी, स्क्रीनप्ले, बेस्ट ब्याकग्राउंड म्यूजिक, अणि बेस्ट साउंड डिजाईन, बेस्ट मेल सपोर्टिंग एक्टर असे सात पुरस्कार आहेत. हे एवढा माहित असून सुद्धा माझा काही मूवी बघण्याचा योग येत नव्हता, अणि त्यानंतर निखिल ने वर लिहिलेली कविता ऐकवली अणि मी म्हटल बास आता "उड़ान" घ्यायची.

           जेव्हा मुले मोठी व्हायला लागतात, त्याना कंठ फुटायला लागतो (म्हणजे सर्वानाच फुटतो, त्यात नविन असे काही नाही), त्याना त्यांच वेगळं अस व्यक्तित्व जाणवायला लागत. पालकांच्या इछा, आकांक्षा हे एक त्यांच्यावर अतिरेक आहे अस वाटायला लागत( नेहमी असेच असत असे नाही). त्यावेळेस ती बंड करून उठतात अणि आपल्या सर्वाना हे सत्य नाकारून चालणार नाही  की पिढ्या नि पिढ्यापासून हा प्रोब्लेम सुरूच आहे. असो मुद्दा असा आहे की आपल्या आयुष्यात आपल्या सर्वाना एकदा तरी आपली इच्छेविरुद्ध कुणाच्या समोर वाकाव लागत, मग ते कधी आपले सिनिअर्स असतात, कधी बॉस, कधी नातेवाईक, तर कधी आणखी कुणी. उड़ान आपल्याला मुलगा अणि शिस्तेचा अतिरेक झालेले वडिल यांच्यातील समंद्धाबद्दल सांगते, अणि सोबतच एक प्रेरणा देते की आयुष्यातील ही सर्व बंधने झुगारून तुम्ही मुक्तपणे आपल्याला जे आवडते ते करू शकता.

          शिमला च्या एका अति चांगल्या शाळेच्या हॉस्टल पासून मूवी ला सुरुवात होते. चार तरुण मुले(मित्र) जेमतेम मिसरुड फुटलेली, होस्टल ची भिंत ओलांडून अडल्ट पिक्चर बघायला जातात अणि तिथेच वार्डन चौघाना पकडतो. प्रिंसिपल चौघाना एक्सपेल करून घरी पाठवून देतो. यादरम्यान विशेषता कॉलेज तरुणांना आवडतील असे काही संवाद आहेत अणि जे ऐकून तुम्हाला ही तुमचे कॉलेज दिवस नक्की आठवतील.

           रोहन (रजत बारमेचा) हा त्या चौघांपैकी एक. एक्सपेल झाल्यावर, वार्डन रोहनला त्याचे वडिल रोनित रॉय कड़े जमशेदपुरला आणून सोडतो. घरी आल्यावर रोहन ला कळत की त्याचा एक सावत्र लहान भाऊ (अर्जुन) पण आहे. अणि हे तिघे पुरुष एकाच घरात एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असतात. रोनित रॉय हा मिलिट्री-सदृश अतिशय शिस्त-प्रिय अस व्यक्तिमत्व आहे. ते रोहन ला त्याच्या इच्छेविरुद्ध  पार्ट टाइम इंजीनियरिंग अणि पार्ट टाइम त्याच्या मेटल फैक्ट्रीत जबरदस्तीने काम करायला लावतात. अर्जुन जो की फ़क्त ६-७ वर्षाचा आहे, त्याला अभ्यासाची अति सक्ती करतो. आपल्याला पापा न म्हणता 'सर' म्हणावे ही विचित्र मागणी, अणि त्याला दिलेल कारन ही तेवढच तिरपट. त्याच्या ह्या विचित्र अणि शिस्त-प्रिय वागन्यामुळे दोन सावत्र भाऊ, ज्यांचे आधी पटत नसते, ते मात्र जवळ येतात.


छोटी छोटी छितराई यादें
बिछी हुई हैं लम्हों की लॉन पर.
नंगे पैर उनपर चलते-चलते
इतनी दूर चले आये
की अब भूल गए हैं – जूते कहाँ उतारे थे. एडी कोमल थी, जब आये थे.
थोड़ी सी नाज़ुक है अभी भी.
और नाज़ुक ही रहेगी
इन खट्टी-मीठी यादों की शरारत
जब तक इन्हें गुदगुदाती रहे.
सच, भूल गए हैं, की जूते कहाँ उतारे थे.
पर लगता है,
अब उनकी ज़रुरत नहीं.

मधल्या काळात रोहन चे त्याच्या मित्रांशी फोनवर चोरून बोलन होत असत, तेव्हा त्याला कळत की त्याच्या बाकी ३ मित्रानी मुंबईत एक होटल सुरु केले आहे, अणि सर्वे तिथे काम करून मजेत आहे. ते रोहनला पण मुंबईला ये म्हणतात. रोहन आपल्या भावना मनात लपवत जगत असतो, एके दिवशी अर्जुन अचानकपने हॉस्पिटलला अड्मिट होतो. अर्जुनला हॉस्पिटलला सोडून, रोनित रॉय काही कामानिमीत्त कोलकत्ता ला जातो. इकडे रोहन आपल्या कवितांनी अणि गोष्टीनी सर्व डॉक्टर, नर्सेस अणि पेशंट्सची मने जिंकतो. कोलकत्ता हुन परत आल्यावर रोनित रॉय ला कळते की रोहन इंजीनियरिंग ला नापास झाला आहे. त्या रात्रि मुलगा अणि वडिल यांच्यातील बाचाबाची, प्रश्ने, उत्तर-प्रतिउत्तर. ह्या सिन्स नि मूवी चा टेम्पो हाई नेला आहे.

         रोनित रॉय नि साकारलेला अतिशय शिस्त-प्रिय बाप अप्रतिम. रोनित रॉयने एक बापाबरोबरच, बायको नसलेल्या एकट्या पुरुषाच क्यारेक्टरही छान दाखविला आहे. रोहन (रजत बारमेचा) ही तोडीस-तोड़, बऱ्याच गोष्टी तो त्याच्या डोळ्यातून बोलला आहे. लहान अर्जुन (आयान बरोदिया) ही उत्तम, त्याला सांगितलेल त्याने उत्तम पार पाडल आहे. राम कपूर ने साकारलेला काका ही उत्तम.  मूवीमधे सिनिअर्स सोबतच "मोटू मास्टर" हे गाने ही अप्रतिम - हसून हसून पोट दुखाव अस. डिरेक्टर ची क्रिएटीविटी ही उत्तम, त्याने जमशेदपुर ला उत्तम रित्या दाखविले आहे. बेस्ट सिनेमाटोग्राफी मिळालाय हे कही उगाच नव्हे, रोहन च्या भावना टीपने, त्याचे स्टील फैक्ट्रीच्या बाहेर असलेले सिन्स, रेलवे जवळचे सिन्स, ताण सहन न झाल्यामुले, त्याचा उद्वेग, राग गाडीवर काढलेले सीन अणि बरेच इतर.

           त्या रात्रीनंतर, पुढे काय घडत, रोहन, अर्जुन अणि त्यांचे वडिल रोनित रॉय यांचे पुढे काय होते, हे माहित करून घेण्यासाठी तर उड़ान बघायला हवा. बंधने ही आयुष्यात येणारच, ती कशी पेलायची, किंवा ती कशी झुगारून लावायची, हे आपल आपल्यालाच ठरवाव लागत. कारन या सर्वांचा सामना हा आपल्याला स्वताहालाच करायचा असतो. थोडक्यात ही न चुकवावी अशी एक "उड़ान" आहे. 
कहानी ख़तम है, या शुरवात होने को है,
सुबह नई है ये, या फिर रात होने को है.

Thursday, April 14, 2011

मला मुंबई जगायची आहे...

     निदान प्रत्येकाला कुठल्यातरी गोष्टीचे व्यसन असते, ही बाब मला जरा खट्कायला लागली होती. पण जेव्हा जेव्हा मुंबई चा विषय निघतो, काय कुणास ठाउक मी सुद्धा त्यात सामिल होउन त्यांच्या गोष्टी ऐकेपासून ते माझ्या गोष्टी  सांगत पर्यंत सुटतो, अगदी व्यसनाच्या आहारी गेलेल्यासारखा   :)
     मुंबई अणि मुंबईकर - एक व्यसन अणि एक व्यसनाच्या आहारी गेलेला. कुणाला नौकरीच, कुणाला छोकरीच, अणि कुणाला आणखी कशाच. आधी जेव्हा ह्या अश्या मुंबई बद्दल ऐकायचो तेव्हा गम्मत वाटायची. लोक कुठल्याही गोष्टीचा उहापोह करतात असच वाटायच. अणि परत एक मुंबईकर अशीच त्याची टिंगल उडवायचो. पण मुंबई काय चीज आहे, हे मुंबईला गेल्यावरच कळत. अणि मुंबईला राहून एखादा मुंबईच्या प्रेमात नहीं पडला असा विरळाच.
     मुंबई अणि माझ नात हे लहानपनापासूनच. मी लहान, दुसर्‍या वर्गात. म्हणजे जेमतेम ६-७ वर्षाचा. आई - बाबा सोबत मुंबई ची पहिलीच भेट. समुद्र हा पहिल्यांदा बघितला तोही मुंबईतच. हाजीअलीचा तो जादुमय रस्ता. भरती-ओहोटी हे प्रकार लहान असल्यामुळे कळत नव्हते. अणि त्यामुळेच त्या गायब होणार्‍या रस्त्याची मजा कही औरच वाटत होती. त्या रस्त्यावरच समुद्राच्या पाण्याची चव पण चाखायला मिळाली. रस्ता ओला असल्यामुळे निसरडा झाला होता, अणि मुहूर्त साधला गेला, माझा पाय घसरला अणि मी अर्धा पाण्यात, हो चक्क पाण्यात. बाबांनी हात घट्ट पकडल्यामुळे थोडक्यात निभावल, म्हणजे माझी आवडती चप्पल गेली.  समुद्राच पानी हे खारट असते हे पहिल्यांदा तिथे कळालं. त्यानंतर जुहू बिच, प्लानेटोरियम, गेटवे ऑफ़ इंडिया....अशी बरीच ठिकान बघितली. अणि बस वाटलं की हीच मुंबई. त्यानंतर अस कधी मुंबई अणि मुंबई कधी विषय नाही. अणि सोबत अभ्यास एके अभ्यास करत राहिल्यामुळेच मुंबई च विसर पडला.
     पण ते असता ना, दुनिया गोल है म्हणतात ते काही उगाच नाही. १८ वर्षानंतर इंजीनियरिंगच्या शेवटच्या सरत्या वर्षाला मुंबई ने बोलावन धाडलं. एक आईटी कंपनीत सिलेक्शन झाला, अणि वाटलं मुंबई मी परत एकदा येतो. अणि कुणास ठाउक कुठे माशी शिंकली, मुंबई च पुणे कधी झाल कळालच नाही. आलो पुण्यात. पण  संधि परत एकदा हळूच आली. ट्रेनिंग म्हणून आम्हाला मुंबईला पाठविन्यात आल.
    तेव्हाची मुंबई अणि या मुंबईत आता फरक जाणवायला लागला होता. तेव्हा मुंबई फ़क्त एक गर्दी वाटत होती अणि आता तीच मुंबई गर्दीतही उठून वेगळी दिसत होती. तेव्हा मुंबई अल्लड होती अणि आता ती तरुण झाली होती. मुंबईतली तरुनाई आकर्षित करायला लागली होती. याच मुंबईने ट्रेनिंगला आल्यावर काही अप्रतिम दिवस दाखविलेत. मित्र-मैत्रिणीसोबत मुम्बई भटकलो. मुंबईची रात्र बघितली अणि मुंबईची सकाळही. बेस्ट अणि लोकल ही.
ट्रेनिंग आटोपून पुण्यात परतलो, अणि त्यानंतर मुंबईची एक नियमित अंतराने का होइना वारी करण्याचा नादच लागला. या प्रत्येक वारीत मी मुंबईची विविध रुपे बघितली. कधी तीन हात नाका तर कधी पवई. कधी नातेवाईक तर कधी मित्र. कधी कुणाला भेटण्यासाठी तर कधी फ़क्त बैंडस्टैंड . कधी सिद्धीविनायक तर कधी जीरो ड़ीग्रीज. कधी वाशी तर कधी मरीन ड्राईव्ह. कधी दादर तर कधी नायपाडा. न संपणारी मुंबई. मुंबईच्या आसपास ट्रेक करयाचा असेल तर बदलापुर अणि ठाणे ही आमची मुंबईतिल हक्काची ठिकाने. अणि म्हनुनच मुबई आजू-बाजू परिसरातले ट्रेक पण झालेत. 
     ट्रेक झालेत, मुंबई पण बघितली, पण अजुनही मनात एक हुरहुर लागलेलीच असते. मुंबई बघितली पण मुंबई जगलो असा कधी वाटतच नाही. ही मुम्बई म्हणजे दर्शनीय मुंबई आहे असे मला नेहमी वाटते. मला वाटते खरी मुंबई ही वीकडेस ला सकाळी ७ ची लोकल ला अणि संध्याकाळी ६ च्या लोकल ला सापडते. कामाला जाणारे अणि परतनारे मुंबईकर, ती गर्दी, तो लोकांच सहवास, प्रत्येकाची इच्छित स्थली उतरण्याची धडपड. रात्रीला कामावरून उशिरा परतनारे, रात्रि उशीर झाला तरी आता घरी जायला ऑटो मिळेल काय याची चिंता नसणारे, स्टेशन पासून पायीच जात, आपल्या प्रियजनासोबत मोबाइल वर बोलत जाणारे. रूम / घरी पोहचून स्वयंपाक / जेवण करून मग झोपी जाणारे अणि तेवढ्याच उर्मिने सकाळी ६ ची लोकल पकड्नारे. वीकएंडला मस्तिचा प्लान करने. अक्खा वीकएंड मस्तपैकी एन्जॉय करने. हे सर्व फ़क्त मुंबईतच होऊ शकते. मुंबईची हवेतच ही खासियत आहे की मानुस न थकता अखंडपने काम करत असतो. मला हे सर्व करायच आहे, मला हे सर्व अनुभवायच आहे. मला जिवाची मुम्बई करायची आहे. मुंबई हे एक व्यसन आहे.
       मला मुंबई जगायची आहे...

प्रश्न :   मुंबई जगायची असेल तर मुंबईकर तर व्हावे लागणार नाही ना... ?   :)   :)   :)