Wednesday, March 2, 2011

तेल मालीश... चम्पी...

      खाली लिहिलेले सर्व प्रसंग हे सत्य घटनेवर आधारित आहेत, तरी त्याचा कुठल्याही घटनेशी साम्य आढळल्यास तो योगायोग न समजता मुद्दामच केलेला प्रयत्न आहे हे समजावे...

प्रसंग १ : पुण्यातील एका उच्चभ्रू वस्तीतील (विमाननगर) ठिकान so called SALOON. दाराजवळ जाताच कसल्या तरी वासाने sorry सुगंधाने आमच्या नाकाची पार वाट लावली. आत शिरलो तर एक सुन्दर मुलीने रिसेप्शन ला हाय-फाय इंग्लिश बोलून स्वागत केले, अणि सोफ्यावर sorry Couch वर बसा म्हटले, AC सुरु होताच. थोड्या वेळाने आमचा सुद्धा नम्बर लागला. ब्लैक लेदर असलेल्या खुर्चीवर बसलो. एक मनुष्य आला अणि इंलिश मधे सुरु झाला, Sir what kind of hair cut would you like to have? च्या आयला मनात म्हटला जर मला कळत असता तर सांगितला नसता काय. जरा डिस्कशन नंतर आमचे ठरला की काय हवे आहे. अणि नंतरची १०-१५ मिनिटे तो माझ्या केसांशी युद्ध (delicately) करता होता. ते आटोपल्यावर सहज च विचारला, Can I have some kind of head massage please?, Yes sure - तो म्हणाला. अणि त्यानंतर त्याने त्याची जी मशिनारिस बाहेर काढली, देवा असा वाटला आज हा पार माझा डोक तोडणार. गर गर... इकडून मशीन, तिकडून मशीन, कानावर मशीन, मानेवर मशीन, झुप झाप..१५ मिनिटे तो फिरवत राहिला... मनात म्हटल काय केल अणि याला चम्पी करायला सांगितला, ह्याला चम्पी मधला काही कळत की नाही. आता बस असे म्हणून एकदाची त्याने थांबवली.
हे सर्व झाल्यावर ३ आकडी बिल त्याने हातात दिले (३ आकडी, अरे काय गंमत आहे काय, एवढ बिल लावायला ). शांतपणे ते बिल पे केल. रिसेप्शन ला परत एकदा त्या सुन्दर मुलीने म्हटल  'Thanks for coming Sir, we would like have provide you service again.' 

२ महीन्यानंतर .....

प्रसंग २ : पुण्यातील एका मध्यमवर्गीय वस्तीतील (चंदन नगर) ठिकान - केश कर्तनालय (Men's parlor). आतल्या माणसाने एक पोराला आवाज देऊन म्हटले, 'ए चंदू ते पडलेले केस उचल, पेपर बाजूला कर अणि साहेबांना बसायला जागा दे, या साहेब या, बसा.' चंदू एक जुनी केरसुनी घेउन आला अणि केस उचलु लागला. केस उचलून झाले अणि त्याने पंखा लावला. थोड्या वेळाने माझा नंबर आला. बसलो खुर्चीत. एक किरमिजी रंगाच्या कपड़ाने त्याने मला झाकले. 'साहेब केस बारीक़ करू की मीडियम ठेवू ?', च्याआयला हा प्रश्न ना एखाद्या bouncer पेक्षा कमी नहीं, याला उत्तर नहीं दिले तर तो काहीतरीच कापणार अणि सांगीतला तर तुम्हीच म्हणाला होता अस म्हणून परत आपल्यालाच दोष... 'मीडियम च ठेवा'-मी. झाली केस कापायला सुरुवात झाली..
कच कच कच कच, कैची चाले डोक्यावर, केस पड़े जमिनीवर :) . १० मिनिटे हा खेळ झाल्यावर, त्याने विचारले साहेब आणखी काय करू?  'आज जरा डोक दुखते आहे, डोक्याची मालिश करा' -मी.   जरा वेळाने तो 'नवरत्न' तेल घेउन आला. (हो तेच ठंडा - ठंडा कूल कूल). हातावर तेल घेउन आता त्याची बोटे माझ्या डोक्यावर तबला वाजवायला लागली. ठण्ड तेल अणि मसाज, what a combination! आता ती बोटे कधी मानेवर, कधी कपाळावर फिरायला लागली होती, अणि मधेच कान पिचकत होती. शरीराचा थकवा नि मस्तकातील क्षीण दूर पळायला लागले होते. मन प्रफुल्लित व्हायला सुरुवात झाली होती.
मसाज झाल्यावर शेविंग पण करून घेतली. थोडक्यात रविवार ची मस्त अशी सुरुवात झाली होती. २ आकडी बिल देऊन मी केश-कर्तनालयाच्या sorry SALOON च्या बाहेर निघालो.