Monday, April 22, 2013

दुनियादारी... मी वाचलेली / अनुभवलेली

           बरयाच दिवसांनी लिहिण्यासाठी वेळ मिळाला.... कारण ही तसच काहिस होत... खरतर मला आधि मेलबर्न च्या अनुभवलेल्या गमतीजमती तुम्हाला सांगायच्या होत्या.. लिहिण्यासारख ही बरच काही होत.. आहे...
पण त्याही अगोदर सु. शि. म्हणजे सुहास शिरवडकरांनी जो माझ्या डोक्यात विचारांचा काहुर माजवला तो सांगायचा आहे...

मागील दोन-एक वर्षांपासुन माझ्या मनातील सुहास शिरवडकरांची "दुनियादारी" वाचण्याची ईच्छा पुर्ण झाली.
मागील एक-दोन आठवड्यांपासुन सम्या (समीर), स्नेहल आणि माझ्या गप्पांचा विषय दुनियादारीच होता.. कारण दुनियादारी वर मराठी फिल्म करण्याच धाडस संजय जाधव करत आहेत. दुनियादारी बद्दल असलेल एक सुप्त आकर्षण, सम्या मुळे पुर्ण झाल... सम्या म्हणाला कि त्याच्याकडे हे पुस्तक आहे .. परंतु पठ्ठ्याने हे पुस्तक आणायला एक आठवडा घेतला. पण स्नेहल ते हिसकावुन घेऊन नंतर दोन दिवसांनी मला दिल..
रात्रीला जेव्हा स्नेहल ने मला व्हाट्स ऍप ला मेसेज टाकला की तिच पुस्तक वाचुन पुर्ण झालय..तेव्हापासुनच मनात एक हुरहुर वाटायला लागली ... बास माझ ठरल कि ऊद्याला ऑफिस मधन लवकर कलटि मारायची आणि शिरवडकरांची हि दुनियादारी अनुभवायची.. दुसर्या दिवशी स्नेहल कडुन पुस्तक घेतल आणि संध्याकळी सहालाच ऑफिस मधुन धुम ठोकली. संध्याकाऴी सहा वाजुन एकोनपन्नास मिनिटांनी दुनियादारीला सुरुवात केली...

       दुनियादारी
दुनियादारी
आत्ता कुठे अश्क्या च्या भडकवन्यावरुन, डि.एस.पी. ऊर्फ डिग्याने श्रेय़स च्या कानाखाली वाजविली होती... हिच श्रेय़स ची एस.पी. कॉलेजच्या कट्टा गँग ची पहिली ओऴख.
यानंतर कथेतील एक-एक पात्र पुढे यायला लागली. श्री, नितीन, उन्म्या, नित्या, मध्या, साईनाथ, सुरेखा, मिनू, शिरिन, एम. के.शोत्रि, मिस्टर व मिसेस तळवळकर.... खरं सांगतो. ..यातील सगळे कॅरेक्टर्स अगदी रोजच्या पहाण्यातले, म्हणुन तर हि पात्रे कधि कथेत येतात आणी आपल्यातील ऐक होउन जातात हे कऴतच नाहि. या कथेत कट्टा आहे, मारामारी आहे, रोजच्या बोलण्यातील शिव्या आहेत...पण ते उगाच आहे अस वाटतच नाही, कारण कौलेजला असतांना आपणही असेच वागत बोलत असतो. त्यामुळे सगळे प्रसंग अगदी आपलेच आहेत अस वाटायला लागत...

श्रेय़स तळवलकर मध्ये कधी आपण स्वतःला तर कधी आपल्या जवळपास वावरत असे्लेल्या नाव दुसरे असेल पण व्यक्ती तीच, घरात प्रॊब्लेम म्हणून हॊस्टेलवर राहनारा, हुषार, हजरजबाबी, स्पष्ट व मनमोकळा, मनाने सच्चा असा मुलगा दिसतो.  मित्रांसाठी जिव देणारा व घेणारा पण स्वत:चे काय ह्याची फिकिर नसलेला डि. एस. पी.  / डिग्या हा देखील आपल्यातलाच एक असा दिसतो. 
मीनू आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणारी, प्रियकराच्या मैत्रीणीवर जळणारी व आई वडिलांचा दबाव म्हणुन अचानक प्रियकराच्या जिवनातून जाणारी...
शिरिन सामंजस्य, विचारांनी ओतप्रोत असलेली.. पण प्रेमाच्या बाबतीत नक्की काय हवय हे जाणुन सुद्धा फसनारी..आपल्याला नक्कीच कुणाचीतरी आठवण करुन देते.
मित्रांना दगा देणारा अशोक व साईनाथ नावाचे पात्रे देखील आपल्या आसपासचेच आहेत अस जाणवत. आणी कुठल्याही बार हमखास सापडनारा एम. के. शोत्री..जरा स्वभाव निराळा असेल पण बाकी सगळे सेम असनारा म्हणजे जगण्याचं स्वत:चं वेगळं असं एक तत्वज्ञान ... त्यांचं दर्दी आणि थेट काळ्जात हात घालणारं बोलण मनाला भिडत..

या कथेत काय नाही? म्हटल तर काहिच नाही कारण आपल्यातीलच एक कथा...आणि म्हटल तर सर्वच काहि... एक वेगळीच दुनियादारी.. कारण य़ात कट्टा आहे..मैत्री आहे, भांडण आहे, मारामारी आहे, प्रेम आहे, सेक्स आहे, द्वेष आहे, प्रेमाची उत्कंठा आहे तर प्रेमभंग पण आहे..आई-वडिलांबद्दल प्रेम आणि तिरस्कार ही आहे. अशी ही दुनियादारी वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवायचं पुस्तक आहे.. जो पर्यंत आपण ते उघडत नाही, तो पर्यंत ठिक आहे, पण एकदा उघडलं की मग मात्र संपवल्या शिवाय ठेवणार नाही ह्याची मला खात्री पटली.

यातील एक पात्र ज्याबद्दल मला आवर्जुन बोलायाच वाटत ते म्हणजे शिरिन. पुस्तक वाचणारा प्रत्येक पुरुष वाचक त्याच्या आयुष्यात आलेल्या कुण्या खास व्यक्तीशी शिरीनची तुलना केल्याखेरीज रहात नाही. शिरिन म्हणजे निश्चल आणि उथळतेच एक सुंदर रसायन.. शिरिन म्हणजे सोंदर्य आणि विचारवंत स्त्री च प्रतीक.. जी प्रत्येकालाच त्याच्या आय़ुष्यात हविहविशी वाटते. तिचे एक वाक्य मनाला खुपच भिडुते आणि ते म्हणजे, " आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते, परंतु तिची वेळ मात्र चुकीची असते."अश्या या शिरिन बद्दल शिरवडकरांनी आणखी लिहायला हव होत अस मला वाटत. शिरिन कथेत आहे पण तिच्या भावनांना पुर्ण न्याय मिळाला अस वाटत नाही..कथा पुर्णपने श्रेयस ला समोर ठेवुन घडते पण तिथेहि कुठेतरी शिरिन जर आणखी विस्तारली असती तर कदाचीत कथेला एक वेगळ द्रुष्टिकोन लाभला असता.....

असो....
पण खरच दुनियादारी हे एक व्यसन आहे हे म्हणन वावग ठरनार नाहि. कॉलेजात जाणाऱ्या मुलाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे. आणि कॉलेज संपल जरी असल तरी दुनियादारी कळुन घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचायला हव.

तर अशी हि आपल्यातीलच पात्रे असनारी कथा मी रात्री एक पन्नास ला संपविली... एक तर भन्नाट असा शेवट झाला...आणि त्यानंतर ह्या पात्रांनी माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी आणि आयुष्यातील व्यक्तिंशी सांगड घालायला सुरुवात केली..त्यामुळे तर रात्र तर आणखी कठिन व्हायला लागली... रात्री चार पर्यंत मी जागा होतो आणी दुसर्या दिवशी ऑफिस मद्धे सुद्धा त्याच विचारात...
 
आजही या क़थेतील काही पात्रे डोळ्यासमोर येऊन तरळत राहतात...आणी आपसुकच मनात येत.. ही दुनिया म्हणजे वास्तवाचं भान देणारी दुनियादारी.


http://www.youtube.com/watch?v=qdnVCbRGFzA