Sunday, February 20, 2011

अल्टि पल्टी दे घुमाके, ये वर्ल्ड कप हमको ही दिला दे

         नाही नाही म्हणता म्हणता मला पण या विषयावर लिहायचा मोह मला आवरला नाही. ज्याने सर्वाना जोडून ठेवला आहे अश्या एक "क्रिकेट" नावाच्या महायुद्धला सुरुवात झाली आहे. ओपनिंग सरेमोनी त ब्रायन महाशयांनी तर गाने म्हणून रंगतच आणली, आणि सोबतीला सोनू निगम आणि शंकर महादेवन ही होते...तर एकुणच दिमाखदार अशीच सोहळ्याची सुरुवात होती.    

       आणि आता ज्याची आपण सर्व आतुरतेने वात बघत होतो तो दिवस आला... भारत (ज्याला तुम्ही इंडिया म्हणून संबोधता, क्रिकेट खेळताना)  आणि बांग्लादेश यांच्यातील पहिली मैच. वातावरण तर आधीच क्रिकेटमय अणि त्यात शनिवार पहिली मैच..आता पुढे काय राव...२:३० वाजले बंगलादेश ने टॉस जिंकुन भारताला फलंदाजी (ब्याटिंग) ला बोलावल...आणि क्रिकेट विश्वातील सर्वात बेस्ट ओपनिंग जोड़ी (आफ्टर ऑल मी भारतीय आहे)  सचिन अणि सेहवाग आलेत..पहिला बॉल अणि...४ , बस तिथेच ठरला की मैच आपण जिंकणार. सचिन च्या ब्याटिंगला आपण मुकलो खरे अणि बहुतेक तेच सेहवाग ला खटकल अणि म्हणून काय त्याने एकट्यानेच त्याचे अणि सचिनचे दोघांचे रन्स काढलेत तेहि पूर्ण १७५. सोबतीला कळस म्हणून कोहली होताच अणि त्याने त्याच 'विराट' स्वरूपात नॉट आउट १०० रन्स केलेत. अणि पुढे काय तुम्हा सर्वाना तर माहितच आहे, भारताने त्याच दिमाखात पहिली मैच जिंकली.
          चला सुरुवात तर चांगली झाली आहे...वातावरण ही क्रिकेटमय आहेच.. म्हणजे अवघी पंढरीच ही क्रिकेट च्या रंगात न्हाउन निघाली आहे...अपेक्षा करुया की हेच वातावरण असेच राहिल आणि आपल्याला भारताच्या अश्याच म्याचेस (जिंकनार्‍या) आपल्या बघायला मिळोत....अणि परत एकदा हा विश्व कप आपल्यालाच मिळावा हीच अपेक्षा...
                 तर सर्व मिळून म्हणा   "अल्टि पल्टी दे घुमाके, ये वर्ल्ड कप हमको ही दिला दे"