Monday, January 31, 2011

देवी तुझ्या दारी आलो..

कालचीच गोष्ट...
घरी बसल्या बसल्या बोअर व्हायला लागल म्हणून मी, जीजाजी अणि ताई, असे आम्ही तिघे निघालो भटकायला..
एअक्चुली, ताई अणि जिजाजींना पुण्यात थोडा काम होता...आणि मी बोअर होत असल्यामुळे, मी सुद्धा बरोबर निघालो..
तर जिजाजींचे ओळखीचे एक जन नाशिक फाटा क्रॉस झाल्यावर "सॅन्डविक" कंपनीच्या अगदी पुढे रहायचे, जिजाजीना काम असल्यामुळे ताई अणि मी काय करायचे म्हणून समोरच असलेल्या श्री आई माता मंदिर येथे गेलो.

ते म्हणतात ना देवीच बोलावन आल्याशिवाय तुम्ही तिच्या दाराताही पाउल ठेऊ शकत नाही, असच काही...कारण ध्यानी मनी नसताना आम्ही तेथे पोहचलो.

काय सुंदर ते मंदिर. पांढर्या शुभ्र संगमरवरी दगडात मंदिर कोरल आहे. स्वछ अणि निर्मल असाच ते.
राजस्थानी कलेच ते मंदिर. (अस मला वाटतय, ते कस काय हे नंतर...)
आत गेलो अणि देवीची ती लोभस्वानी ती मूर्ति पाहून मन प्रस्सन झाले. अणि नशीब तर एवढा थोर की आम्ही पोहोचलो अणि आरतीला सुरुवात झाली.
लयबद्ध, ताल अणि सुरात झालेली त्या आरतीने, कानाचे अणि डोळ्यांचे पारणे फेडले. तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ति करतोय, पण नाही, अचानक भेटलेला आनंद, 'जेष्ठ' महिन्याच्या च्या गर्मिनंतर आलेल्या पहिल्या पावसाने जेवढ बर वाटत, तसाच काहीसा तो अनुभव होता. (कारण आपण देवाचे दर्शन तसेही फार कमी घेतो  :)  ) अणि हो प्रसाद ही छान आहे.

श्री आई माता मंदिर, हे मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर, "सॅन्डविक" कंपनीच्या अगदी समोर आहे.
 

4 comments:

Sandeep Sangvikar said...

सही आहे. अचानक मंदिरात गेल्यावर देव पण प्रसन्न होत असेल आणि म्हनुनंच मंदिर पण छान वाटते.

:)

Rahul (राहुल) said...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद संदीप.
कदाचित हे सुद्धा एक कारण असू शकेल

snehal said...

Khup chan lihile ahe Rahul.. ata malahi tya mandirat javasa vatat ahe.. :)

Rahul (राहुल) said...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद स्नेहल.
हो मंदिर खरच खुप छान आहे, एकदा नक्की जा, आवडेल तुला.