Sunday, January 8, 2012

जावे कांगारूच्या देशा...

             शेवटी तो दिवस उजाडला... अगदी वेळेपर्यंत मेडिसिन्स, टयाब्लेट्स जमा करून बैग मधे  टाकेपर्यंत घरी दारावर गाड़ी आलेली होती. हातातला पनीर पराठा तोंडात कोम्बत मी ड्रायवरला थांबन्याचा इशारा केला. दिवाळी असल्यामुळे ताई-जीजाजी पुण्यात नव्हतेच. त्यामुळे एअरपोर्ट ला एकटाच जायला निघालो. कसाबसा दोन्ही बैग सांभाळत मी खाली उतरलो. ड्राईवर पण मराठी असल्यामुळे वाटल चला मुम्बई पर्यंतच प्रवास तरी बोलत होणार. गणपती बाप्पाच नाव घेतल अणि पुणे सोडल.
गप्पा करत नविन मुंबई-पुणे हायवेला लागलो. संध्याकाळचे ५ वाजत आले होते अणि हायवेला लागुन जेमतेम १/२ तासच झाला होता, आणि नशिबात लिहल होत तेच घडल...

गाड़ी पंचर झाली.              
झाल...... आजपर्यंत जे काही दुसऱ्या लोकांबद्दल ONSITE  जातांना वाईट ऐकल होत... वाटल बहुतेक आपण सुद्धा आता त्याच पंक्तिमधे जाउन बसणार. भरिस भर म्हणजे डिक्कीत ठेवलेली एकुलती एक स्टेपनी सुद्धा पंचर निघाली. दुष्काळात तेरावा महिना काय असतो याचा प्रत्ययच आला. एक तर हायवेला, जिथे गाडी थांबविन्याची परवानगी नसते, अशा ठिकाणी गाड़ी थांबली.  नको ते विचार डोक्यात गर्दी करायला  लागले होते. करणार काय.... फ़ोन वर फ़ोन सुरु झाले. याला फ़ोन... त्याला फ़ोन. गाड़ी जेथून बुक केली तो म्हणला की दुसरी गाडी पोहचायला आणखी ४५ मिनिटे लागणार. पर्याय नव्हता, ठीक आहे म्हंटल.
आता नविन काय तर या ड्राईवरला काय सुचल कुणास ठाऊक, म्हणाला, "सर, तुम्ही नविन गाड़ीसाठी  वेट करा, तोपर्यंत मी गाडीची स्टेपनी ठीक करून आणतो. जर आधी झाल तर हीच गाड़ी पुढे नेऊ." त्याने माझ्या दोन्ही मोठ्या बैगस खाली ठेवल्या, अणि तो निघून गेला.
आता त्या भल्यामोठ्या हायवेला, सुसाट जाण्याऱ्या गाड्यांच्या आवाजात, मी, माझी सैक, अणि दोन मोठ्या बैगस, अशे आम्ही चौघे उभे होतो.
जाण्याऱ्या-येणाऱ्या गाडीतील लोक विचित्र नजरेने मला बघत होती. गाड़ी कुणीच थांबवत नव्हत. अंधार पडायला लागला होता. बाजुच्या शेतातील म्हशी सुद्धा मला बघून हसत आहे अस वाटायला लागल होत. थोड्यावेळाने एक गाडी लेफ्ट ला होउन माझ्या पुढे थांबली, माझ्याकरिताच आली होती... बघून हायस वाटल.
संध्याकाळचे ६ वाजले होते  आणि आता पण एअरपोर्ट ला तरी वेळेवर पोहचू की नहीं याच टेंशन आल होत. दूसरा ड्राईवर सुद्धा  मराठीच निघाला, म्हटल  राजा बघ आपल्याला वेळेत ईंटरनॅशनल विमानतळ ला पोहचायच  आहे. तो म्हणाला घाबरू नका सर, तुम्हाला वेळेतच सोडतो.
 देवाला विनंती केली आणि नमस्कार करून एअरपोर्ट कड़े कूच केल. त्याने ज्या वेगाने गाडी न्यायला सुरुवात केली, माला खात्री पटली विमानतळ तर नाही पण देवाकडे हा वेळेत नक्की सोडेल.

                  मुंबई.... इथल्या गर्दी बद्दल मी वेगळ काय लिहिणार.. संध्याकाळी कामाने दमलेला मुंबईकर घरी जायला बसने, लोकलने, ऑटोने निघालेला असतो.  त्यात भर  म्हणजे फ्रायडे ला पुणेकर सुद्धा मुंबईला येत असतात आणि म्हणूनच वीकेंडला मुंबईत समुद्राला भरती अणि माणसांची गर्दी जरा जास्त असते.
  तर अश्या ह्या गर्दीच्या वेळी मी मुंबईकराना कसेतरी बाजूला रेटत वाट काढत चाललो होतो. वेळ इतका भरभरा जात होता की असा वाटायला लागल की आज उसेन बोल्ट ( हो तोच जमैकाचा ) जरी मला घेउन धावला तरी आज तो घड्याळाला हरवू शकणार नाही. मला पुण्याहून वाशी पर्यंत पोहचायला जेवढा वेळ नाही लागला, तितकाच किंबहुना त्याहून ही जास्त वेळ वाशी- चेम्बूर- घाटकोपर-अंधेरी-सान्ताक्रुज़ येथून वाट काढायला लागला.
"उफ़ ये मुंबई की भीड़  :(  "
(मुंबई जी मला आवडते, मी तिच्याकारिता हे बोलून गेलो )

--------------------------

शेवटी एकदाचा पोहोचलो.... छत्रपति शिवाजी ईंटरनॅशनल एअरपोर्ट
राव, काय सांगू  पण असल लै भारी वाटायला लागल होत.  मज्जा मज्जा. गम्मत वाटायला लागली होती. ईंटरनॅशनल फ्लाईट... ईंटरनॅशनल प्यासेंजर.. वाह वाह. चेहर्यावर ख़ुशी आणि मनात भीती अस ते विचित्र वातावरण तयार झाल होत. दोन्ही मोठ्या बैग काढत इकडे-तिकडे बघत मी खाली उतरलो. सी-ऑफ करायला शेवटी एक मित्र आला - क्षितिज . थैंक्स यार.  ट्रॉली त्यानेच ओढून दिली. वरन मी कितीही निडर पना दाखवत होतो, पण कळत होत नवख्या पोरीला, पहिल्यांदाच पोरगा बघायला आल्यावर ती कशी वागते.. अस कहिस माझा सुरु होत. महिन्याभर पुर्वीच क्षितिज उ.स. (U.S.) हून परत आल्यामुळे, तो आता मला एअरपोर्ट एथिक्स शिकवत होता. इकडे हे असते..तिकडे टिकेट काउंटर. इकडे बैग चेकिंग. तिकड़े अम्क- ढिमक... असे काहीतरी सांगत होता. एक तर फ़क्त पनीर पराठा खाउन निघालो असल्यामुळे..जाम भूक लागायला लागली होती. लक्ष कुठेच लागत नव्हत. वरच्या टीवी वर फ्लाईट चे आकडे बघत आणि काउंटर नंबर बघत होतो.  वेळ झाली. क्षितिज ला बाय केल आणि मी आत शिरलो.

ईंटरनॅशनल एअरपोर्ट - ओ तेरी.. भला मोठा असा एक हॉल.. त्याची 'ही' भिंत पण दिसत नव्हती अणि 'ती' भिंत पण दिसत नव्हती. मनातल्या मनात भितियुक्त हसू येत होत. जवळच उभ्या असलेल्या एका एयरलाइंस च्या व्यक्तीला विचारल की, बाबारे हे काउंटर कुठे आहे ? त्यानेही हसून सांगितला की यु-टर्न घेउन सरळ जा, डाव्या बाजूला दिसेल. २-३ मिनिटे सरळ चालत गेलो आणि डाव्या बाजूला दिसल "मलेशियन एयरलाइंस". ८-१० भले मोठे काउंटर त्यानीच घेरून ठेवले होते. एका काउंटर ला भली मोठी रांग होती. मला बर्याच लोकानी आधीच सांगुन ठेवल होत की सामान चेक-इन करायल बराच वेळ लागतो. मी पण म्हटल की ठीक आहे.. आलिया भोगासी... लागुया रांगेत.
जवळच एक व्यक्ति इम्मीग्रेशन चे फॉर्म्स देत होता, फॉर्म्स देताना तो म्हणाला की जर तुम्ही ऑनलाइन चेक-इन कल असेल तर तुम्ही डिरेक्ट त्या दुसर्या काउंटर ला जाऊ शकता.   .... तर दुसर्या काउंटर ला जाउन सामानाच वजन केल, चेक-इन केल. चेक-आउट एट मेलबोर्न ओनली. ट्याग लागलेत.

एक टप्पा पार पडला आता दूसरा टप्पा होता इम्मीग्रेशन चेक. हॉल च्या दुसर्या टोकाला काचेच्या काही भिंती आहेत, तिथेच इम्मीग्रेशन चेक होत, असा तो इम्मीग्रेशन चे फॉर्म्स देणारा व्यक्ति म्हणाला.
निघालो.
इथे सुद्धा आमच्या मित्रानी ख़ास बजावल होत... इम्मीग्रेशन फॉर्म्स वर खोड़तोड़ करायची नाही, निट वाचून भरायचा, नाहीतर रिजेक्ट होतो. इम्मीग्रेशन ऑफिसर खुप प्रश्न विचारतो, आड़मुठेपना करतो, सांभाळून उत्तरे द्यायची. अशे सल्ले देणारे मित्र असल्यावर तुम्हाला आणखी कुणाची गरज भासणार. २ इम्मीग्रेशन फॉर्म्स मी भरले अणि म्हटला, जो होगा अब देखा जायेगा, अणि रांगेत लागलो. एक एक करत रांग पुढे सरकत होती. अणि माझा नंबर आला.


इम्मीग्रेशन ऑफिसरने मला बघितला, फॉर्म बघितला, पासपोर्ट बघितला... अणि जा म्हटला.
मी पुन्हा विचारल, बास... जाऊ? तो हो म्हटला... इतक्या शिव्या दिल्या मी मनात... च्या आयला उगाचच भीती दाखवली पोरांनी... खोदा पहाड़ और निकला चूहा अस काहीतरी घडल ते.

फोटो फ़क्त दाखविण्यासाठी
आता तीसरा टप्पा म्हणजे चेकिंगचा. तिथे पण रांग. वेळ पास करायला फ़ोन लावुया म्हटल तर त्या भागात नेटवर्क ला रेंज नाही. ईंटरनॅशनल प्यासेंजर च्या रांगेत आता मी पण होतो. जवळ पोहोचलो अणि तेवढ्यात "किंगफिशर" च्या हवाई सुंदरी आल्या. थैंक्स टु "माल्या" अंकल. बीअर अणि सुंदरी अगदी निवडून पाठवतात ते फ्लाईट मधे. गोर्‍या-गोर्‍या सुंदरी, त्यांचे लाल कपडे अणि लाल बैगस, सही कॉम्बिनेशन :).  १० मिनिटे यात गेली, काय त्याना आधी प्रेफेरंस असतो ना. 
           हवाई सुंदरी गेल्यात, आणि मग आमचा पण नंबर आला. सर्व इलेक्ट्रोनिक्स सामान, बेल्ट, वॉलेट -बुल्लेट (असली तर ) काढून एक ट्रे मधे ठेवून पुढे गेलो. तोपर्यंत मी त्यांचे स्क्यानर बघत होतो. खरच सुई पण शोधू  शकतील इतकी पॉवरफ़ुल असत्तात. झाल एकदाच चेकिंग आणि मी खाली उतरलो.
ड्यूटी फ्री गुड्स - जिकडे तिकडे पाट्या झळकायला लागल्या. आपल्याकडे लक्ष्मी रोड ला असतात तसच काहिस :) फरक हेच की शोफिसटीकेटेड अणि फेरीवाला यांची जशी जाहिरात. एक-एक दुकान बघत मी जात होतो. क्रिस्टल्स, पर्ल्स, डायमंड्स... अशी एकसे एक दुकाने.

फोटो फ़क्त दाखविण्यासाठी
बास... पुढचे दुकान दिसले अणि मी थबकलो. इतकी सुंदर, मस्त फिगर.............. जैक डॅनिअल शेल्फ मधे उभी होती. अणि फ़क्त $३७. आपल्याकडे मुलींना तुळशीबागेत गेल्यावर, आमच्याकड़े सर्वात रास्त अणि स्वस्त दरात वस्तु मिळेल, अशी पाटी बघून जो आनंद होतो, तसाच काहीसा मला बघून झाला. बराच वेळ मी त्या दुकानात सुंदर आणि मस्त फिगर असलेल्या बाटल्या बघत होतो. बघता बघता वेळ निघून गेला आणि कळलं सुद्धा नाही, अचानक घड्याळ बघितल तर ११.४५ झाले होते. घाई करून गेट पर्यंत पोहचलो तर तिथे सुद्धा आत जाण्याची रांग लागली होती. टिकेट दाखवून मी गेट च्या आत शिरलो. (च्या आयला मी पण आता ईंटरनॅशनल फ्लाईट मधे बसणार :). ) सिट शोधली, सामान वर टाकले, अणि पुढच्या ५ च मिनिटात इंजिन स्टार्ट झाले आणि विमान रस्त्याला लागल. (म्हणजे रन-वे ला आल).

 मधली टिप  :  हाईट ऑफ़ फेसबुक एडीक्षण - खर आहे पण विमानाचे इंजिन स्टार्ट होत पर्यंत, मी
मोबाइलहून FB वर अपडेट्स टाकत होतो. त्या हवाई सुंदरी ने म्हटल नसत तर कदाचित मी मोबाइल पण बंद केला नसता.



विमान वर उडाले, सुंदर लाइट च्या प्रकाशत जगमगनारी मुंबई बघितली अणि मनात म्हटल बाय बाय इंडिया  :(

------------------

रात्र असल्यामुळे बाहेरच काहीच दिसत नव्हत. थोडावेळ मूवी बघून, झोप येत नसतानाही मी झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. सकाळी पहाटे ५ च्या सुमारास खिड़कीतुन प्रकाश यायला लागला, बाहेर बघतो तर मी अंटार्क्टिकात, जिकडे तिकडे आइस-बर्ग्स, बर्फाची भली मोठी पर्वत... डोळे चोळले अणि परत बघितल, तर मी ढगात होतो. अप्रतिम अस ते दृश्य होत. फोटो घेण्याचा मी प्रयत्न केला पन तो प्रयत्न क्षुद्र निघाला. DSLR नसल्याची खंत मला फार जानवली. पुढचा १ - १.१५ तास मी ते दृश्य माज्या डोळ्यात साठवत होतो.  अनाउन्समेंट झाली की पुढच्या १५ मिनिटात कुआलालंपुर - मलेसिया पोहोचतोय.

रेन फोरेस्ट
कुआलालंपुर ईंटरनॅशनल एअरपोर्ट - ३ तासाच ट्रांसिट टाइम असल्यामुळे हे एअरपोर्ट बघता आल. सकाळचा विधि आटोपून मी एअरपोर्ट बघायला मोकळा होतो. काय जबरदस्त एअरपोर्ट आहे हे.  "+" प्लस या आकाराचे हे एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट च्या आत सेंटर ला भल मोठा रेन फोरेस्ट आहे. मलेशियातील जंगलांच ते प्रतिक आहे अस म्हणतात.

बोईंग


रात्रीला मी बोईंग मधे बसलो पण त्याची भव्यता मला कळाली नाही, सकाळी एक टर्मिनल हुन जेव्हा बोईंग बघितला.. डोळ्यांचे पारने फिटले. लाजवाब.
ते बघून पुढे गेलो तर PC ठेवलेले दिसले. तिथे पण फ्री इन्टरनेट PC असल्याने लगेचच फब (FB) वर अपडेट टाकल :)


पुढच्या फ्लाईट ची वेळ झाली होती. पुढचा प्रवास ८ तासांचा होता, त्यापैकी ४-५ तास तर फ़क्त समुद्र दिसणार होता. कुआलालंपुर सोडल अणि मेलबोर्न कड़े कूच केल. फ्लाईट मधील बेचव जेवणाचा अणि मूविसचा आनंद घेत वेळ पास करन सुरु होत. फ्लाईट मधील सुंदर प्यासेंजर आधीच बघून झाले होते ना .. ;)
---------------

नविन कर्मभूमि - ऑस्ट्रेलिया
बाहेर  फ़क्त समुद्र दिसत होता. थोड्या वेळाने अचानक जमीन दिसायला लागली. हो तीच ती, माझी नविन होणारी कर्मभूमि - ऑस्ट्रेलिया.
समुद्र आणि जमीन ह्यांच मिलन आकाशातून बघताना मजा येत होती. आणखी २.३० - ३ तास उरले होते. बाहेर बघता बघता हा वेळ सुद्धा निघून गेला. रात्रीचे ९ वाजले आणि अनाउन्समेंट झाली की थोड्याच वेळात मेलबोर्न ईंटरनॅशनल एअरपोर्ट ला उतरतोय.  इतनी खुशी - इतनी खुशी (बास एवढे इमोशंस पुरे आहेत). विमान लैंड झाल अणि मी आता कांगारूच्या देशात होतो.
इम्मीग्रेशन, आणि सिक्यूरिटी चेक पार करण्याचे दिव्य आता करायचे होते. सुदैवाने जास्त कही ओढातान झाली नहीं पण १ - १:३० तास लागले. बाहेर आलो अणि दीर्घ मोकळा श्वास घेतला. घ्यायला गाड़ी येणारच होती पण चुकामुक झालीच, अणि घेतलेला  दीर्घ मोकळा श्वास अडकला. गाडीच दूषण हे इथे पण पाठलाग करणार वाटत. १ तास झाला मी ड्राइवर शोधतोय, पण कुठेच पत्ता नाही. आता थोडीशी भीती वाटायला लागली होती. कारण ड्राइवर फ़क्त १ तास वाट बघणार अस मेल मधे लिहिल होत. माझी एअरपोर्ट वरील फरपट बघून देवाला दया आली, एक एशियन सदृश व्यक्ति मला विचारायला लागली काय झाला, मी आपला किस्सा त्याला ऐकवला, आणि त्याने मग मला थोड़ी बुद्धि दिली की त्या कार कंपनी ला फ़ोन कर, अणि त्याने त्याच्या जवळचे $२ मला दिले. नविन देशात, पहिल्याच वेळेला मला मिळालेल्या मदतीने मी भारावलो.  फ़ोन केला पलीकडील व्यक्तीला माझा प्रॉब्लम समजवायला २-३ मिनिटे गेली, पण त्याला एकदाच कळलं आणि म्हटला की एअरपोर्ट वरील जवळच्या कॉफी-शॉप च नाव सांग अणि तिथे उभा रहा, अणि तो ड्राइवर ला तिथे पाठवेल. ओके
चौथ्या मिनिटाला ड्राइवर तिथे हजर.

सुट-बूट मधला ड्राइवर बघून मजा वाटली. म्हणाला की तो माझी बाहेर वाट बघत होता. बाहेर आलो तर ohhhhhhhhhhhhh......  BMW  माझी वाट बघत होती.  आतून रोयल... क्लास.....   
१ तासाच चीज़ झाल्यासारखा वाटल, आणि BMW  एअरपोर्ट हुन, होटल कड़े निघाली.

होटल ला पोहचत पर्यंत रात्रीचे ११:३० झाले होते. मला दारापाशी उतरवून तो निघून गेला. आत गेलो होटल चेक-इन च्या फोर्मलिटिस पूर्ण केल्या आणि मागे वळून बघतो तर दाराशी जिगरी उभा - योगेश मैड :)
धावत जाउन मीठी मारली. १ वर्षानंतर आम्ही दोघे एकमेकांना भेटत होतो. होटल रूम ला जाउन बैग ठेवल्या, फ्रेश झालो आणि योगेश च्या घरी निघालो.
घरी पोहोचलो अदिति ने स्वयंपाक करुनच ठेवला होता. ऑस्ट्रेलियात मेलबोर्नला पहिल्याच दिवशी रात्री १ ला मी पुरेपुर महाराष्ट्रियन जेवण घेत होतो. माझा स्वतालाच मी अजुनही पुण्यात असल्यासारखा वाटत होत. थैंक्स टु योगेश आणि अदिति.
जेवण करून रात्री ३ ला मी जवळपास ३६ तासा नंतर झोपी गेलो.
वेलकम टू मेलबोर्न - ऑस्ट्रेलिया - कांगारूच्या देशा.... 

 {मेलबोर्न मधील गमती-जमती पुढील लेखात}


12 comments:

Anonymous said...

changal ahe..lihit ja...ajoon uttam hoil
Hazaron Khwahishen Aisi

Rahul (राहुल) said...

धन्यवाद हर्षद सामंत.
जमेल तेवढ आनी तस लिहिण्याचा आणी आणखी प्रयत्‍न करतो.
प्रतीक्रिया मिळाल्या की नवीन लिहिण्याचा हुरुप येतो.

onkar said...

Mast.Khupach changle lihile ahe.
Maja ali vachun.
Good. Pudhchya lekhachi vat baghtoy.

Rahul (राहुल) said...

धन्यवाद ओंकार.
असेच वाचत रहा, आनंद घेत रहा , आणि प्रतिक्रिया देत रहा.
पुढचा लेख लवकरच...

Rahul said...

मजा आली राव वाचून...वाटलं पोहोचलो मेलबोर्नला..!!!! एन्जोय कर...
किती वर्ष आहेस तिथे..???

shree said...

Nice post.....:-)

Pradip Hedaoo said...

छान वर्णन केले आहेस. superlike....

Amol B said...

झकास मित्रा,
तू लिखाण चालू ठेव, आम्ही वाचन चालू ठेवतो

Rahul (राहुल) said...

धन्यवाद राहुल हिवरे.
:) मेलबोर्नला पोहचलेत ... छान आता पुढच्या गमती सोबत करु.
वाचत रहा. आनंद घेत रहा आणी प्रतिक्रिया देत रहा.

Rahul (राहुल) said...

धन्यवाद प्याडी .....
वाचत रहा. आनंद घेत रहा आणी प्रतिक्रिया देत रहा.

Rahul (राहुल) said...

धन्यवाद श्री...
वाचत रहा. आनंद घेत रहा आणी प्रतिक्रिया देत रहा.

Rahul (राहुल) said...

धन्यवाद अमोल.
एका गरजू लेखकाला फक्त आणी फक्त तुमच्या प्रतिक्रियांची गरज असते पुढच्या लेखनासाठी.
पुढचा लेख लवकरच...
वाचत रहा. आनंद घेत रहा आणी प्रतिक्रिया देत रहा.