Monday, April 22, 2013

दुनियादारी... मी वाचलेली / अनुभवलेली

           बरयाच दिवसांनी लिहिण्यासाठी वेळ मिळाला.... कारण ही तसच काहिस होत... खरतर मला आधि मेलबर्न च्या अनुभवलेल्या गमतीजमती तुम्हाला सांगायच्या होत्या.. लिहिण्यासारख ही बरच काही होत.. आहे...
पण त्याही अगोदर सु. शि. म्हणजे सुहास शिरवडकरांनी जो माझ्या डोक्यात विचारांचा काहुर माजवला तो सांगायचा आहे...

मागील दोन-एक वर्षांपासुन माझ्या मनातील सुहास शिरवडकरांची "दुनियादारी" वाचण्याची ईच्छा पुर्ण झाली.
मागील एक-दोन आठवड्यांपासुन सम्या (समीर), स्नेहल आणि माझ्या गप्पांचा विषय दुनियादारीच होता.. कारण दुनियादारी वर मराठी फिल्म करण्याच धाडस संजय जाधव करत आहेत. दुनियादारी बद्दल असलेल एक सुप्त आकर्षण, सम्या मुळे पुर्ण झाल... सम्या म्हणाला कि त्याच्याकडे हे पुस्तक आहे .. परंतु पठ्ठ्याने हे पुस्तक आणायला एक आठवडा घेतला. पण स्नेहल ते हिसकावुन घेऊन नंतर दोन दिवसांनी मला दिल..
रात्रीला जेव्हा स्नेहल ने मला व्हाट्स ऍप ला मेसेज टाकला की तिच पुस्तक वाचुन पुर्ण झालय..तेव्हापासुनच मनात एक हुरहुर वाटायला लागली ... बास माझ ठरल कि ऊद्याला ऑफिस मधन लवकर कलटि मारायची आणि शिरवडकरांची हि दुनियादारी अनुभवायची.. दुसर्या दिवशी स्नेहल कडुन पुस्तक घेतल आणि संध्याकळी सहालाच ऑफिस मधुन धुम ठोकली. संध्याकाऴी सहा वाजुन एकोनपन्नास मिनिटांनी दुनियादारीला सुरुवात केली...

       दुनियादारी
दुनियादारी
आत्ता कुठे अश्क्या च्या भडकवन्यावरुन, डि.एस.पी. ऊर्फ डिग्याने श्रेय़स च्या कानाखाली वाजविली होती... हिच श्रेय़स ची एस.पी. कॉलेजच्या कट्टा गँग ची पहिली ओऴख.
यानंतर कथेतील एक-एक पात्र पुढे यायला लागली. श्री, नितीन, उन्म्या, नित्या, मध्या, साईनाथ, सुरेखा, मिनू, शिरिन, एम. के.शोत्रि, मिस्टर व मिसेस तळवळकर.... खरं सांगतो. ..यातील सगळे कॅरेक्टर्स अगदी रोजच्या पहाण्यातले, म्हणुन तर हि पात्रे कधि कथेत येतात आणी आपल्यातील ऐक होउन जातात हे कऴतच नाहि. या कथेत कट्टा आहे, मारामारी आहे, रोजच्या बोलण्यातील शिव्या आहेत...पण ते उगाच आहे अस वाटतच नाही, कारण कौलेजला असतांना आपणही असेच वागत बोलत असतो. त्यामुळे सगळे प्रसंग अगदी आपलेच आहेत अस वाटायला लागत...

श्रेय़स तळवलकर मध्ये कधी आपण स्वतःला तर कधी आपल्या जवळपास वावरत असे्लेल्या नाव दुसरे असेल पण व्यक्ती तीच, घरात प्रॊब्लेम म्हणून हॊस्टेलवर राहनारा, हुषार, हजरजबाबी, स्पष्ट व मनमोकळा, मनाने सच्चा असा मुलगा दिसतो.  मित्रांसाठी जिव देणारा व घेणारा पण स्वत:चे काय ह्याची फिकिर नसलेला डि. एस. पी.  / डिग्या हा देखील आपल्यातलाच एक असा दिसतो. 
मीनू आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणारी, प्रियकराच्या मैत्रीणीवर जळणारी व आई वडिलांचा दबाव म्हणुन अचानक प्रियकराच्या जिवनातून जाणारी...
शिरिन सामंजस्य, विचारांनी ओतप्रोत असलेली.. पण प्रेमाच्या बाबतीत नक्की काय हवय हे जाणुन सुद्धा फसनारी..आपल्याला नक्कीच कुणाचीतरी आठवण करुन देते.
मित्रांना दगा देणारा अशोक व साईनाथ नावाचे पात्रे देखील आपल्या आसपासचेच आहेत अस जाणवत. आणी कुठल्याही बार हमखास सापडनारा एम. के. शोत्री..जरा स्वभाव निराळा असेल पण बाकी सगळे सेम असनारा म्हणजे जगण्याचं स्वत:चं वेगळं असं एक तत्वज्ञान ... त्यांचं दर्दी आणि थेट काळ्जात हात घालणारं बोलण मनाला भिडत..

या कथेत काय नाही? म्हटल तर काहिच नाही कारण आपल्यातीलच एक कथा...आणि म्हटल तर सर्वच काहि... एक वेगळीच दुनियादारी.. कारण य़ात कट्टा आहे..मैत्री आहे, भांडण आहे, मारामारी आहे, प्रेम आहे, सेक्स आहे, द्वेष आहे, प्रेमाची उत्कंठा आहे तर प्रेमभंग पण आहे..आई-वडिलांबद्दल प्रेम आणि तिरस्कार ही आहे. अशी ही दुनियादारी वाचायचं पुस्तक नाही तर अनुभवायचं पुस्तक आहे.. जो पर्यंत आपण ते उघडत नाही, तो पर्यंत ठिक आहे, पण एकदा उघडलं की मग मात्र संपवल्या शिवाय ठेवणार नाही ह्याची मला खात्री पटली.

यातील एक पात्र ज्याबद्दल मला आवर्जुन बोलायाच वाटत ते म्हणजे शिरिन. पुस्तक वाचणारा प्रत्येक पुरुष वाचक त्याच्या आयुष्यात आलेल्या कुण्या खास व्यक्तीशी शिरीनची तुलना केल्याखेरीज रहात नाही. शिरिन म्हणजे निश्चल आणि उथळतेच एक सुंदर रसायन.. शिरिन म्हणजे सोंदर्य आणि विचारवंत स्त्री च प्रतीक.. जी प्रत्येकालाच त्याच्या आय़ुष्यात हविहविशी वाटते. तिचे एक वाक्य मनाला खुपच भिडुते आणि ते म्हणजे, " आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळते, परंतु तिची वेळ मात्र चुकीची असते."अश्या या शिरिन बद्दल शिरवडकरांनी आणखी लिहायला हव होत अस मला वाटत. शिरिन कथेत आहे पण तिच्या भावनांना पुर्ण न्याय मिळाला अस वाटत नाही..कथा पुर्णपने श्रेयस ला समोर ठेवुन घडते पण तिथेहि कुठेतरी शिरिन जर आणखी विस्तारली असती तर कदाचीत कथेला एक वेगळ द्रुष्टिकोन लाभला असता.....

असो....
पण खरच दुनियादारी हे एक व्यसन आहे हे म्हणन वावग ठरनार नाहि. कॉलेजात जाणाऱ्या मुलाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे. आणि कॉलेज संपल जरी असल तरी दुनियादारी कळुन घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचायला हव.

तर अशी हि आपल्यातीलच पात्रे असनारी कथा मी रात्री एक पन्नास ला संपविली... एक तर भन्नाट असा शेवट झाला...आणि त्यानंतर ह्या पात्रांनी माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी आणि आयुष्यातील व्यक्तिंशी सांगड घालायला सुरुवात केली..त्यामुळे तर रात्र तर आणखी कठिन व्हायला लागली... रात्री चार पर्यंत मी जागा होतो आणी दुसर्या दिवशी ऑफिस मद्धे सुद्धा त्याच विचारात...
 
आजही या क़थेतील काही पात्रे डोळ्यासमोर येऊन तरळत राहतात...आणी आपसुकच मनात येत.. ही दुनिया म्हणजे वास्तवाचं भान देणारी दुनियादारी.


http://www.youtube.com/watch?v=qdnVCbRGFzA 



Sunday, January 8, 2012

जावे कांगारूच्या देशा...

             शेवटी तो दिवस उजाडला... अगदी वेळेपर्यंत मेडिसिन्स, टयाब्लेट्स जमा करून बैग मधे  टाकेपर्यंत घरी दारावर गाड़ी आलेली होती. हातातला पनीर पराठा तोंडात कोम्बत मी ड्रायवरला थांबन्याचा इशारा केला. दिवाळी असल्यामुळे ताई-जीजाजी पुण्यात नव्हतेच. त्यामुळे एअरपोर्ट ला एकटाच जायला निघालो. कसाबसा दोन्ही बैग सांभाळत मी खाली उतरलो. ड्राईवर पण मराठी असल्यामुळे वाटल चला मुम्बई पर्यंतच प्रवास तरी बोलत होणार. गणपती बाप्पाच नाव घेतल अणि पुणे सोडल.
गप्पा करत नविन मुंबई-पुणे हायवेला लागलो. संध्याकाळचे ५ वाजत आले होते अणि हायवेला लागुन जेमतेम १/२ तासच झाला होता, आणि नशिबात लिहल होत तेच घडल...

गाड़ी पंचर झाली.              
झाल...... आजपर्यंत जे काही दुसऱ्या लोकांबद्दल ONSITE  जातांना वाईट ऐकल होत... वाटल बहुतेक आपण सुद्धा आता त्याच पंक्तिमधे जाउन बसणार. भरिस भर म्हणजे डिक्कीत ठेवलेली एकुलती एक स्टेपनी सुद्धा पंचर निघाली. दुष्काळात तेरावा महिना काय असतो याचा प्रत्ययच आला. एक तर हायवेला, जिथे गाडी थांबविन्याची परवानगी नसते, अशा ठिकाणी गाड़ी थांबली.  नको ते विचार डोक्यात गर्दी करायला  लागले होते. करणार काय.... फ़ोन वर फ़ोन सुरु झाले. याला फ़ोन... त्याला फ़ोन. गाड़ी जेथून बुक केली तो म्हणला की दुसरी गाडी पोहचायला आणखी ४५ मिनिटे लागणार. पर्याय नव्हता, ठीक आहे म्हंटल.
आता नविन काय तर या ड्राईवरला काय सुचल कुणास ठाऊक, म्हणाला, "सर, तुम्ही नविन गाड़ीसाठी  वेट करा, तोपर्यंत मी गाडीची स्टेपनी ठीक करून आणतो. जर आधी झाल तर हीच गाड़ी पुढे नेऊ." त्याने माझ्या दोन्ही मोठ्या बैगस खाली ठेवल्या, अणि तो निघून गेला.
आता त्या भल्यामोठ्या हायवेला, सुसाट जाण्याऱ्या गाड्यांच्या आवाजात, मी, माझी सैक, अणि दोन मोठ्या बैगस, अशे आम्ही चौघे उभे होतो.
जाण्याऱ्या-येणाऱ्या गाडीतील लोक विचित्र नजरेने मला बघत होती. गाड़ी कुणीच थांबवत नव्हत. अंधार पडायला लागला होता. बाजुच्या शेतातील म्हशी सुद्धा मला बघून हसत आहे अस वाटायला लागल होत. थोड्यावेळाने एक गाडी लेफ्ट ला होउन माझ्या पुढे थांबली, माझ्याकरिताच आली होती... बघून हायस वाटल.
संध्याकाळचे ६ वाजले होते  आणि आता पण एअरपोर्ट ला तरी वेळेवर पोहचू की नहीं याच टेंशन आल होत. दूसरा ड्राईवर सुद्धा  मराठीच निघाला, म्हटल  राजा बघ आपल्याला वेळेत ईंटरनॅशनल विमानतळ ला पोहचायच  आहे. तो म्हणाला घाबरू नका सर, तुम्हाला वेळेतच सोडतो.
 देवाला विनंती केली आणि नमस्कार करून एअरपोर्ट कड़े कूच केल. त्याने ज्या वेगाने गाडी न्यायला सुरुवात केली, माला खात्री पटली विमानतळ तर नाही पण देवाकडे हा वेळेत नक्की सोडेल.

                  मुंबई.... इथल्या गर्दी बद्दल मी वेगळ काय लिहिणार.. संध्याकाळी कामाने दमलेला मुंबईकर घरी जायला बसने, लोकलने, ऑटोने निघालेला असतो.  त्यात भर  म्हणजे फ्रायडे ला पुणेकर सुद्धा मुंबईला येत असतात आणि म्हणूनच वीकेंडला मुंबईत समुद्राला भरती अणि माणसांची गर्दी जरा जास्त असते.
  तर अश्या ह्या गर्दीच्या वेळी मी मुंबईकराना कसेतरी बाजूला रेटत वाट काढत चाललो होतो. वेळ इतका भरभरा जात होता की असा वाटायला लागल की आज उसेन बोल्ट ( हो तोच जमैकाचा ) जरी मला घेउन धावला तरी आज तो घड्याळाला हरवू शकणार नाही. मला पुण्याहून वाशी पर्यंत पोहचायला जेवढा वेळ नाही लागला, तितकाच किंबहुना त्याहून ही जास्त वेळ वाशी- चेम्बूर- घाटकोपर-अंधेरी-सान्ताक्रुज़ येथून वाट काढायला लागला.
"उफ़ ये मुंबई की भीड़  :(  "
(मुंबई जी मला आवडते, मी तिच्याकारिता हे बोलून गेलो )

--------------------------

शेवटी एकदाचा पोहोचलो.... छत्रपति शिवाजी ईंटरनॅशनल एअरपोर्ट
राव, काय सांगू  पण असल लै भारी वाटायला लागल होत.  मज्जा मज्जा. गम्मत वाटायला लागली होती. ईंटरनॅशनल फ्लाईट... ईंटरनॅशनल प्यासेंजर.. वाह वाह. चेहर्यावर ख़ुशी आणि मनात भीती अस ते विचित्र वातावरण तयार झाल होत. दोन्ही मोठ्या बैग काढत इकडे-तिकडे बघत मी खाली उतरलो. सी-ऑफ करायला शेवटी एक मित्र आला - क्षितिज . थैंक्स यार.  ट्रॉली त्यानेच ओढून दिली. वरन मी कितीही निडर पना दाखवत होतो, पण कळत होत नवख्या पोरीला, पहिल्यांदाच पोरगा बघायला आल्यावर ती कशी वागते.. अस कहिस माझा सुरु होत. महिन्याभर पुर्वीच क्षितिज उ.स. (U.S.) हून परत आल्यामुळे, तो आता मला एअरपोर्ट एथिक्स शिकवत होता. इकडे हे असते..तिकडे टिकेट काउंटर. इकडे बैग चेकिंग. तिकड़े अम्क- ढिमक... असे काहीतरी सांगत होता. एक तर फ़क्त पनीर पराठा खाउन निघालो असल्यामुळे..जाम भूक लागायला लागली होती. लक्ष कुठेच लागत नव्हत. वरच्या टीवी वर फ्लाईट चे आकडे बघत आणि काउंटर नंबर बघत होतो.  वेळ झाली. क्षितिज ला बाय केल आणि मी आत शिरलो.

ईंटरनॅशनल एअरपोर्ट - ओ तेरी.. भला मोठा असा एक हॉल.. त्याची 'ही' भिंत पण दिसत नव्हती अणि 'ती' भिंत पण दिसत नव्हती. मनातल्या मनात भितियुक्त हसू येत होत. जवळच उभ्या असलेल्या एका एयरलाइंस च्या व्यक्तीला विचारल की, बाबारे हे काउंटर कुठे आहे ? त्यानेही हसून सांगितला की यु-टर्न घेउन सरळ जा, डाव्या बाजूला दिसेल. २-३ मिनिटे सरळ चालत गेलो आणि डाव्या बाजूला दिसल "मलेशियन एयरलाइंस". ८-१० भले मोठे काउंटर त्यानीच घेरून ठेवले होते. एका काउंटर ला भली मोठी रांग होती. मला बर्याच लोकानी आधीच सांगुन ठेवल होत की सामान चेक-इन करायल बराच वेळ लागतो. मी पण म्हटल की ठीक आहे.. आलिया भोगासी... लागुया रांगेत.
जवळच एक व्यक्ति इम्मीग्रेशन चे फॉर्म्स देत होता, फॉर्म्स देताना तो म्हणाला की जर तुम्ही ऑनलाइन चेक-इन कल असेल तर तुम्ही डिरेक्ट त्या दुसर्या काउंटर ला जाऊ शकता.   .... तर दुसर्या काउंटर ला जाउन सामानाच वजन केल, चेक-इन केल. चेक-आउट एट मेलबोर्न ओनली. ट्याग लागलेत.

एक टप्पा पार पडला आता दूसरा टप्पा होता इम्मीग्रेशन चेक. हॉल च्या दुसर्या टोकाला काचेच्या काही भिंती आहेत, तिथेच इम्मीग्रेशन चेक होत, असा तो इम्मीग्रेशन चे फॉर्म्स देणारा व्यक्ति म्हणाला.
निघालो.
इथे सुद्धा आमच्या मित्रानी ख़ास बजावल होत... इम्मीग्रेशन फॉर्म्स वर खोड़तोड़ करायची नाही, निट वाचून भरायचा, नाहीतर रिजेक्ट होतो. इम्मीग्रेशन ऑफिसर खुप प्रश्न विचारतो, आड़मुठेपना करतो, सांभाळून उत्तरे द्यायची. अशे सल्ले देणारे मित्र असल्यावर तुम्हाला आणखी कुणाची गरज भासणार. २ इम्मीग्रेशन फॉर्म्स मी भरले अणि म्हटला, जो होगा अब देखा जायेगा, अणि रांगेत लागलो. एक एक करत रांग पुढे सरकत होती. अणि माझा नंबर आला.


इम्मीग्रेशन ऑफिसरने मला बघितला, फॉर्म बघितला, पासपोर्ट बघितला... अणि जा म्हटला.
मी पुन्हा विचारल, बास... जाऊ? तो हो म्हटला... इतक्या शिव्या दिल्या मी मनात... च्या आयला उगाचच भीती दाखवली पोरांनी... खोदा पहाड़ और निकला चूहा अस काहीतरी घडल ते.

फोटो फ़क्त दाखविण्यासाठी
आता तीसरा टप्पा म्हणजे चेकिंगचा. तिथे पण रांग. वेळ पास करायला फ़ोन लावुया म्हटल तर त्या भागात नेटवर्क ला रेंज नाही. ईंटरनॅशनल प्यासेंजर च्या रांगेत आता मी पण होतो. जवळ पोहोचलो अणि तेवढ्यात "किंगफिशर" च्या हवाई सुंदरी आल्या. थैंक्स टु "माल्या" अंकल. बीअर अणि सुंदरी अगदी निवडून पाठवतात ते फ्लाईट मधे. गोर्‍या-गोर्‍या सुंदरी, त्यांचे लाल कपडे अणि लाल बैगस, सही कॉम्बिनेशन :).  १० मिनिटे यात गेली, काय त्याना आधी प्रेफेरंस असतो ना. 
           हवाई सुंदरी गेल्यात, आणि मग आमचा पण नंबर आला. सर्व इलेक्ट्रोनिक्स सामान, बेल्ट, वॉलेट -बुल्लेट (असली तर ) काढून एक ट्रे मधे ठेवून पुढे गेलो. तोपर्यंत मी त्यांचे स्क्यानर बघत होतो. खरच सुई पण शोधू  शकतील इतकी पॉवरफ़ुल असत्तात. झाल एकदाच चेकिंग आणि मी खाली उतरलो.
ड्यूटी फ्री गुड्स - जिकडे तिकडे पाट्या झळकायला लागल्या. आपल्याकडे लक्ष्मी रोड ला असतात तसच काहिस :) फरक हेच की शोफिसटीकेटेड अणि फेरीवाला यांची जशी जाहिरात. एक-एक दुकान बघत मी जात होतो. क्रिस्टल्स, पर्ल्स, डायमंड्स... अशी एकसे एक दुकाने.

फोटो फ़क्त दाखविण्यासाठी
बास... पुढचे दुकान दिसले अणि मी थबकलो. इतकी सुंदर, मस्त फिगर.............. जैक डॅनिअल शेल्फ मधे उभी होती. अणि फ़क्त $३७. आपल्याकडे मुलींना तुळशीबागेत गेल्यावर, आमच्याकड़े सर्वात रास्त अणि स्वस्त दरात वस्तु मिळेल, अशी पाटी बघून जो आनंद होतो, तसाच काहीसा मला बघून झाला. बराच वेळ मी त्या दुकानात सुंदर आणि मस्त फिगर असलेल्या बाटल्या बघत होतो. बघता बघता वेळ निघून गेला आणि कळलं सुद्धा नाही, अचानक घड्याळ बघितल तर ११.४५ झाले होते. घाई करून गेट पर्यंत पोहचलो तर तिथे सुद्धा आत जाण्याची रांग लागली होती. टिकेट दाखवून मी गेट च्या आत शिरलो. (च्या आयला मी पण आता ईंटरनॅशनल फ्लाईट मधे बसणार :). ) सिट शोधली, सामान वर टाकले, अणि पुढच्या ५ च मिनिटात इंजिन स्टार्ट झाले आणि विमान रस्त्याला लागल. (म्हणजे रन-वे ला आल).

 मधली टिप  :  हाईट ऑफ़ फेसबुक एडीक्षण - खर आहे पण विमानाचे इंजिन स्टार्ट होत पर्यंत, मी
मोबाइलहून FB वर अपडेट्स टाकत होतो. त्या हवाई सुंदरी ने म्हटल नसत तर कदाचित मी मोबाइल पण बंद केला नसता.



विमान वर उडाले, सुंदर लाइट च्या प्रकाशत जगमगनारी मुंबई बघितली अणि मनात म्हटल बाय बाय इंडिया  :(

------------------

रात्र असल्यामुळे बाहेरच काहीच दिसत नव्हत. थोडावेळ मूवी बघून, झोप येत नसतानाही मी झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो. सकाळी पहाटे ५ च्या सुमारास खिड़कीतुन प्रकाश यायला लागला, बाहेर बघतो तर मी अंटार्क्टिकात, जिकडे तिकडे आइस-बर्ग्स, बर्फाची भली मोठी पर्वत... डोळे चोळले अणि परत बघितल, तर मी ढगात होतो. अप्रतिम अस ते दृश्य होत. फोटो घेण्याचा मी प्रयत्न केला पन तो प्रयत्न क्षुद्र निघाला. DSLR नसल्याची खंत मला फार जानवली. पुढचा १ - १.१५ तास मी ते दृश्य माज्या डोळ्यात साठवत होतो.  अनाउन्समेंट झाली की पुढच्या १५ मिनिटात कुआलालंपुर - मलेसिया पोहोचतोय.

रेन फोरेस्ट
कुआलालंपुर ईंटरनॅशनल एअरपोर्ट - ३ तासाच ट्रांसिट टाइम असल्यामुळे हे एअरपोर्ट बघता आल. सकाळचा विधि आटोपून मी एअरपोर्ट बघायला मोकळा होतो. काय जबरदस्त एअरपोर्ट आहे हे.  "+" प्लस या आकाराचे हे एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट च्या आत सेंटर ला भल मोठा रेन फोरेस्ट आहे. मलेशियातील जंगलांच ते प्रतिक आहे अस म्हणतात.

बोईंग


रात्रीला मी बोईंग मधे बसलो पण त्याची भव्यता मला कळाली नाही, सकाळी एक टर्मिनल हुन जेव्हा बोईंग बघितला.. डोळ्यांचे पारने फिटले. लाजवाब.
ते बघून पुढे गेलो तर PC ठेवलेले दिसले. तिथे पण फ्री इन्टरनेट PC असल्याने लगेचच फब (FB) वर अपडेट टाकल :)


पुढच्या फ्लाईट ची वेळ झाली होती. पुढचा प्रवास ८ तासांचा होता, त्यापैकी ४-५ तास तर फ़क्त समुद्र दिसणार होता. कुआलालंपुर सोडल अणि मेलबोर्न कड़े कूच केल. फ्लाईट मधील बेचव जेवणाचा अणि मूविसचा आनंद घेत वेळ पास करन सुरु होत. फ्लाईट मधील सुंदर प्यासेंजर आधीच बघून झाले होते ना .. ;)
---------------

नविन कर्मभूमि - ऑस्ट्रेलिया
बाहेर  फ़क्त समुद्र दिसत होता. थोड्या वेळाने अचानक जमीन दिसायला लागली. हो तीच ती, माझी नविन होणारी कर्मभूमि - ऑस्ट्रेलिया.
समुद्र आणि जमीन ह्यांच मिलन आकाशातून बघताना मजा येत होती. आणखी २.३० - ३ तास उरले होते. बाहेर बघता बघता हा वेळ सुद्धा निघून गेला. रात्रीचे ९ वाजले आणि अनाउन्समेंट झाली की थोड्याच वेळात मेलबोर्न ईंटरनॅशनल एअरपोर्ट ला उतरतोय.  इतनी खुशी - इतनी खुशी (बास एवढे इमोशंस पुरे आहेत). विमान लैंड झाल अणि मी आता कांगारूच्या देशात होतो.
इम्मीग्रेशन, आणि सिक्यूरिटी चेक पार करण्याचे दिव्य आता करायचे होते. सुदैवाने जास्त कही ओढातान झाली नहीं पण १ - १:३० तास लागले. बाहेर आलो अणि दीर्घ मोकळा श्वास घेतला. घ्यायला गाड़ी येणारच होती पण चुकामुक झालीच, अणि घेतलेला  दीर्घ मोकळा श्वास अडकला. गाडीच दूषण हे इथे पण पाठलाग करणार वाटत. १ तास झाला मी ड्राइवर शोधतोय, पण कुठेच पत्ता नाही. आता थोडीशी भीती वाटायला लागली होती. कारण ड्राइवर फ़क्त १ तास वाट बघणार अस मेल मधे लिहिल होत. माझी एअरपोर्ट वरील फरपट बघून देवाला दया आली, एक एशियन सदृश व्यक्ति मला विचारायला लागली काय झाला, मी आपला किस्सा त्याला ऐकवला, आणि त्याने मग मला थोड़ी बुद्धि दिली की त्या कार कंपनी ला फ़ोन कर, अणि त्याने त्याच्या जवळचे $२ मला दिले. नविन देशात, पहिल्याच वेळेला मला मिळालेल्या मदतीने मी भारावलो.  फ़ोन केला पलीकडील व्यक्तीला माझा प्रॉब्लम समजवायला २-३ मिनिटे गेली, पण त्याला एकदाच कळलं आणि म्हटला की एअरपोर्ट वरील जवळच्या कॉफी-शॉप च नाव सांग अणि तिथे उभा रहा, अणि तो ड्राइवर ला तिथे पाठवेल. ओके
चौथ्या मिनिटाला ड्राइवर तिथे हजर.

सुट-बूट मधला ड्राइवर बघून मजा वाटली. म्हणाला की तो माझी बाहेर वाट बघत होता. बाहेर आलो तर ohhhhhhhhhhhhh......  BMW  माझी वाट बघत होती.  आतून रोयल... क्लास.....   
१ तासाच चीज़ झाल्यासारखा वाटल, आणि BMW  एअरपोर्ट हुन, होटल कड़े निघाली.

होटल ला पोहचत पर्यंत रात्रीचे ११:३० झाले होते. मला दारापाशी उतरवून तो निघून गेला. आत गेलो होटल चेक-इन च्या फोर्मलिटिस पूर्ण केल्या आणि मागे वळून बघतो तर दाराशी जिगरी उभा - योगेश मैड :)
धावत जाउन मीठी मारली. १ वर्षानंतर आम्ही दोघे एकमेकांना भेटत होतो. होटल रूम ला जाउन बैग ठेवल्या, फ्रेश झालो आणि योगेश च्या घरी निघालो.
घरी पोहोचलो अदिति ने स्वयंपाक करुनच ठेवला होता. ऑस्ट्रेलियात मेलबोर्नला पहिल्याच दिवशी रात्री १ ला मी पुरेपुर महाराष्ट्रियन जेवण घेत होतो. माझा स्वतालाच मी अजुनही पुण्यात असल्यासारखा वाटत होत. थैंक्स टु योगेश आणि अदिति.
जेवण करून रात्री ३ ला मी जवळपास ३६ तासा नंतर झोपी गेलो.
वेलकम टू मेलबोर्न - ऑस्ट्रेलिया - कांगारूच्या देशा.... 

 {मेलबोर्न मधील गमती-जमती पुढील लेखात}


Tuesday, June 14, 2011

१ चेन मेल... ७ यार... ४ पल्सर... अणि... लेट्स डू ईट - भाग २

 भाग १ वाचण्याकरिता येथे click करा.
 -----------------------------------------------------------------------------------------------
मोठी करण्यासाठी click करा
         बौंबे स्याप्पेर्स कॉलनीच्या बाहेर पडून नगर रोड ला लागलो. जवळच असलेलेल्या IDBI बँकेच्या ATM  ला जाऊन पैसे काढले. अंधार अजून हि होताच सर्व जन एकामागे एक बाईक्स चालवत होळकर ब्रिज पार करून, जुन्या मुंबई-पुणे हायवे ला पायाखालून (म्हणजे बाईक्सच्या  :) ) तुडवत औंध मार्गे नवीन मुंबई-पुणे हायवे ला धडकलो होतो. सुर्य सुद्धा त्याची झोप पूर्ण करून आता ढगांच्या बाल्कनीतून डोकावून पाहायला लागला होता. 


गाडीची टाकी फुल्ल करायची म्हनुन ४ हि पल्सर हायवे ला असलेल्या पेट्रोल पंप ला घेतल्या. सकाळी- सकाळीच पोट खाली केल्याने पोटात कोकायला लागली होती. पेट्रोल पंप ला असलेल्या हॉटेलात सर्व घुसलो. 
पंपावर वळण्याअगोदर (मोठे करण्यसाठी click)
Boys are always Boys या उक्तीप्रमाणे सर्व जन एकमेकांना शिव्या देत मुलींबद्दल्च्या चर्चा करु लागलो- " यार कैसा group है, एक लडकी नही..सारी जींदगी बर्बाद कर दि तुम लोगो ने", हे वाक्य संपत नाही तोवर पेट्रोल पंप ल एका कार ने प्रवेश केला.... 
अ ग ग ग .... सर्वांच्या नजरा तिथेच अटकल्या... लाजवाब अश्या ३ पोरी चुकलो सुंदरी बाहेर पडल्या डोळ्यांवरची गॉगल्स काढत, इकडे तिकडे बघत हॉटेल मध्ये शिरल्या आणि आमच्या शेजारच्या टेबलवर  बसल्या. 
आतापर्यंत खुल्या रेड्या सारखी हैदोस मांडणारी पोर आता गायीसारखी शांत बसली होती. त्यांच्याकडे बघत बघत ७ लोकांनी १६-१७  वडा-पाव संपवलीत. सुंदरी निघाल्यात आणि आम्ही पण मग त्यांच्यामागे निघालो. कार असल्यामुळे ती सर्व नवीन मुंबई-पुणे हायवे वरून सुसाट निघून गेल्यात आणि आम्ही परत जुन्या मुंबई-पुणे हायवेकरिता टर्न घेतला (कारण नवीन मुंबई-पुणे हायवे वरून दुचाकींना बंदी आहे).





आम्हाला साथ द्यायला बरीच मंडळी पण होती... एक सायकलस्वारांचा group पण होता, तो पण तिकडेच निघाला होता....

 
जसा हायवेचा वारा लागायला लागला पल्सर ने सुद्धा आता ऑटोम्यॉटीकली वेग पकडायला सुरुवात केली होती, आणि कधी त्या वेगाने शंभरी गाठली कळल सुद्धा नाही....




आता लोणावळ्यात पोहचलो होतो. सन-सेट पोईन्ट ला आम्ही सन-राईज च्या वेळेस (नंतर)  पोहोचलो, आणि मग तिथे तोड वेळ TP करत फोटो काढून हौस भागवून घेतली. 

उशीर होतोय म्हणून आता न थांबता निघायचं  ठरलं. घाटातली वळणदार रस्ते पार करत, मजल दर मजल करत पेन गाठलं, चहा ची तलब आली म्हणून सर्वे एका टपरीवर थांबलो. चहा, सुट्टा सर्व करून घ्या म्हटला, कारण नंतर नागाव-अलिबाग पर्यंत थांबायचं नव्हत. वाटेत ISPAT industries ची मोठ्ठी factory लागते. मोठ्ठी म्हणजे भव्य... खरच.

आता वारयाची जागा घामाने घ्यायला सुरुवात केली होती. कोकणात पोहच्ल्याची हि सुरुवात होती. कोकणातल्या त्या खाऱ्या वारयापाई आता कधी एकदाचे बीच वर पोहचतो आणि कपडे काढून स्वताला पाण्यात झोकतो अस वाटायला लागल होता. आणि हा असा विचार करतच अंकेत खोत च्या घराजवळ येऊन पोहचलो. घरासमोरच बीच, फक्त मध्ये एक छोटं मैदान आणि समोर नारळाच्या झाडांची शिस्तबद्ध उभी असलेली रांग, एवढाच. inshort उत्तम असा निसर्ग खुणावत होता.

बस...सर्वे जन रूम मध्ये गेलो, फ्रेश झालो... कपडे काढलीत... हो म्हणजे काय बीच वर जायचं तर कपडे घालून जाणार??? लाल -निळ्या रंगाच्या चड्ड्या (swimming costume) घालून फौज निघाली. :) 
अहाहा बीच त्याचे ते सौंदर्य, सुंदर अश्या बीचवर सुंदर मुली :)  :)  :) बस मुली म्हटला कि तुम्हा वचनार्यांच्या चेहर्यावर बघा कसा आनंद झळकायला लागतो, पण मी काही त्या मुलींचे वर्णन करणार नाही...

तर आता आम्ही सर्वांनी स्वताला पाण्यात झोकून दिलेले होतं. पाण्यातून बाहेर बघायला एक वेगळीच मजा येते...
1st राउंड ऑफ स्वीम्मिंग झालेलं होतं, बाहेर येऊन आता काय? समोरच परासैलिंग (parasailing) सुरु होत...चला तर मग एक एक करून सर्वांनी आपला नंबर लावून घेतला, माझा पण चान्स आला. त्या परासैलिंग वाल्या व्यक्तींनी एक बेल्ट कमरेला बांधला, खांद्यावर अडकवला, आणि धाव म्हणाला, तोपर्यंत त्या जीप ने वेग घेतला, आणि बघता बघता मी हवेत ८०-१०० फुट उंचीवर पोहचलो असेल. वाह काय ते दृश्य. एकीकडे नारळांच्या झाडांची रांग तर दुसरीकडे दूरपर्यंत फक्त निळाशार समुद्र. एकीकडे फक्त हिरवा रंग तर दुसरीकडे चकाकणारा निळा रंग. खालची तो छोटी छोटी माणसे बघून, अस वाटून गेल कि आपल्यालाहि जर पंख असते तर कदाचित कधीही कुठेही निसर्गाच्या कुशीत जाता आलं असत.

विचारांच्या गर्तेत असतानाच गाडीचा वेग कमी झाला, आणि मी खाली आलो. सर्वे आता पुरते थकले होते. समोरच असलेल्या दगडावर आम्ही सर्वे जाऊन बसलो. शांत संध्याकाळ, हळुवार समुद्राच्या लाटा बघत मनातले विचार कुठल्या कुठे पळून जातात. वाटत सोडा हा यार जॉब, सोडा ह्या सर्व चिंता.  नको या कटकटी, नको या जबाबदाऱ्या. शांत अश्या या बीच वर राहून आयुष्य काढावे.

मोठे करण्यासाठी click करा
संध्याकाळ झाली, आकाशाने आता रंगांची उधळण करायला घेतली होती. मुक्तहस्ताने तो क्षितिजाच्या कॅनवास वर रंगाची आरास मांडत होता. खूपच छान.  संध्याकाळ निघून तिने रात्रीत कधी प्रेवश केला कळल सुद्धा नाही. 



रूम वर गेलो, थोडा नाश्ता केला, आणि मग परत सर्व बीच वर. रात्रीला तेथे बॉन-फायर केल, खूप धमाल. प्यार भरे नगमे ओर थोडीसी यादे, बस रात्रीला रंग चढायला आणखी काय लागते. :)
खूप मस्ती करून, दमून मंडळी शांत झोपली... फार दिवसानंतर अशी झोप लागली होती.









सकाळी बीच बघायचा आहे म्हणून जाग पण आली... सकाळची हवा बीच वर घेण्यात फार सुख असत, आणि हे एकदा तरी अनुभवायला हवं. तोच अनुभव घेत, आणि नवीन अनुभव साठवत, काही फोटो काढत, भूक वाढवत आम्ही सर्वे रूम कडे परत निघालो. मस्त पैकी पोह्यांची ऑर्डर आधीच देवून ठेवली होती. त्यामुळे बीच वरून परत आल्यवर वाट बघावी लागली नाही. इतके खाऊन सुद्धा पोट भरला नाही म्हणून अंकेत ला अंडा-भुर्जी आणि पाव ची ओर्डर सोडली :). मस्त पैकी अंडा-भुर्जी खाऊन तृप्ती ची ढेकर दिली.

एक समाधान जे शोधण्यासाठी, ऑफिसला मेल्स वर ज्याची चर्चा झाली होती, आणि ज्याकरिता नागाव ला आलो होतो, ते सर्वांच्याच चेहर्यावर दिसत होतो. निघण्यापूर्वीच पुढच्या वेळेला कुठे जाता येईल याच्या planning ला पण सुरुवात झाली होती. पण offcorse मेल्स वर चर्चा झाल्याशिवाय ती पूर्ण होणार कशी? :)
आम्ही सर्व Bikers (Click on Photo)
----------
(समाप्त )

आपल्या प्रतिक्रियेची गरज भासणार आहे.  :)

Sunday, May 8, 2011

१ चेन मेल... ७ यार... ४ पल्सर... अणि... लेट्स डू ईट - भाग १

"मामु बकर मत करो.... अभी तो सुबह के सिर्फ ४ बजे है..." - इति अमितेश उर्फ़ अ‍ॅमी.
अ‍ॅमी -एका मोठ्या आईटी कंपनीत कामगार :) , एक्टिंग / नौटंकी कशी करावी हे शिकाव तर याच्याकड़न.. हा कधी काय बोलून जाईल  अणि पुढ्च्याला गार करेल याचा काही नेम नाही..... तर सकाळी ४ ला जेव्हा मामुनी अ‍ॅमीला उठवल, सॉरी उठवन्याचा प्रयत्न केला तर हा असा कोकलला. अरे हो मामु म्हणजे अभीषेक. मामु सुद्धा एका मोठ्या आईटी कंपनीत कामगारांचे नेते (Team Lead). (हमारी मांगे पूरी करो असे नारे काही लावत नाही ऑफिस मधे बर का, काय सध्या कुणाचा काही नेम नाही, हल्ली कुणी काहीही विचार करतो. व्यक्ति-स्वातंत्र्य..असो...)

"अबे उठ...अभी नौटंकी करेगा तो लेट हो जायेंगे. छोटे इसको लात मारके ऊठा." - मामु. 
तिकडून एक विचित्र आवाज येतो, 
"मामु ये भो**** ऐसे नहीं उठेगा, इसके ऊपर वो commode का पानी डालो  :) "- छोटे म्हणजे पवन. हे महाशय पण आईटी आईटी कंपनीत मजूर, जेमतेम उंच ज़ालेत अणि बरेच पुढे गेलेत. छोटेचा सेन्स ऑफ़ हुमोर इतका जबरदस्त की पुढचा गळून खाली नाही पडला तर नाव बदलेन. 

"अरे ऐ फौजी, तू नहाने क्यों नहीं जा रहा ?" - मामू
"मामू मै सिग्गी जला रहा हु, ये भाजे को भेजो." - फौजी उर्फ़ सुमन. सन १९९९ मधे एक सिनेमा आला होता, 'हम दिल दे चुके सनम', त्यातला वनराज (अजय देवगन) आठवतोय, तो म्हणजे आमचा फौजी म्हणजे शेम टू शेम. फौजी म्हणायला एक कारण हे पण की हे क्यारेक्टेर आईटी कंपनीत कामगार असून सुद्धा, वर्षातून फ़क्त एकदा घरी जाणार, अणि तेहि चांगली मोठी सुट्टी घेउन(कंपनीवर निष्ठां, यातला काही प्रकार नाही). आता सध्या फौजी बऱ्यापैकी सुधरला आहे..खरे तर सुधारला गेला आहे..काय असता लग्न झाल की बदलाव लागते त्यातले हे एक.

"मामू, मोटा है बाथरूम में, वो बाहर आते ही, मै अंदर, पता नाही इतने देर से अंदर क्या कर रहा है..."- इति मी उर्फ़ राहुल भजे :), पण तुम्हाला सांगतो आड्नावाची तर पार आई-बहिन करून टाकली होती या लोकानी ओह्ह सॉरी मजुरांनी. :) सध्या तरी भजे च भाजे केल आहे नंतर पुढे काय काय करून टाकले की तोंड लपवायला ही जागा मिळेल, याची शंका वाटायला लागली होती.

चित्र: मोटा
"साले पुरे सालभर का आजही नहायेगा क्या?" - मी 
"हरा***** आगया ना बाहर, क्यों गला फाड़ के सुबह सुबह पड़ोसियों को जगा रहा है" - एक १०० किलो वजनाचा अजस्त्र प्राणी बाथरूम मधून आवाज करत
बाहेर आला. हा आमचा मोटा उर्फ़ निखिल उर्फ़ बिन बैग उर्फ़ उशी/तकिया उर्फ़ टेडी बेअर उर्फ़ ....आणखी बरच.
**** तर ही सर्व झालीत कथेची पात्रे अणि त्यांच स्माल असा इंट्रोडकशन. चला नाव-बिव झालीत, ब्यैकग्राउंडला गान ही झाल, तर आता कथेला सुरुवात करयाला हरकत नाही... थोडस भुतकाळात जाउया...

एक आट-पाट नगर होत. तिथे एक राजा राज्य करता होता. राजाला एक आवडती अणि एक नावडती, अश्या २ राण्या होत्या...... काय झाल??
अरे मी जरा जास्तच भुतकाळात गेलो...

लेट्स कम सम अहेड.. जास्त नहीं पण ३ वर्षाअगोदरची ऑफिस मधली एक सकाळ...ऑफिस मधील काही मंडळी नाश्त्याच्या तयारीला लागली होती. कुणी PM (प्रोजेक्ट मेनेजर) शी बोलत होते. कुणी, दिवस कसा काढावा याची प्लानिंग करत होते. आणि नेहमी प्रमाने बॉसच्या, क्लाएंटच्या.. अपेक्षांचे ओझे मी आपल्या इवल्याश्या डोक्यावर वाहत होतो, काय करणार दिवसच असे होते की काराव लागत होत...
इ-मेल
तेवढ्यात माझ्या बाकडयावर (ज्याला आपन सर्व डेस्क म्हणतो) ठेवलेल्या संगणकावर काहीतरी हालचाल झाली. बघतो तर काय नविन  पत्र (ई-मेल) आल्याचा पॉप-अप होता.
म्हटला कोण सकाळी-सकाळी काम लावतोय.
बघतो तर काय 'टू' मधे आपली सगळ्या गँग च्या पोरांची नाव, अणि सब्जेक्ट म्हनत होता: Lets Do It. 

विचार केला की असेल काही तरी..TP (टाइमपास)मेल, लगेच १का मिनिटात त्याच सब्जेक्ट ला Re: करून परत एक मेल आली. ती बघतो म्हटला तर, परत Re: सब्जेक्ट करून पुढच्याच क्षणाला आणखी एक मेल.

 आता न राहवून मी ही मेल ओपन केल, मोट्या कडून मेल आली होती..अणि त्याला मामू, अ‍ॅमी ने Re: (reply) केल होत. लिहिल होत की - आपण सर्व खुप काम करतो, थकून जातो, अणि हा थकवा निघायला हवा. खुप दिवस झालेत, आपण सर्व एकत्र भेटलो नाही, भेटूया, गप्पा मारुया, TP करुया, एन्जॉय करुया. बेस्ट म्हणजे आपण सर्व एक छोट्या सुट्टीवर जाउया.
मी पण Re:  केला.
थोड्या वेळाने तर चेन मेल सुरु झाल. प्रत्येकजन आता आपले विचार मांडू लागले होते.
ट्रेकपासून ते बिचपर्यंत अणि वोड्कापासून व्हिस्कीपर्यंत, असे सर्व ऑप्शन चेन मेल मधे आले होते. आता करायच फ़क्त एकाच होते की ठिकान, काळ अणि वेळ ठरवायची होती. अणि नेमकी येथेच गोची होत होती. कुणालाच कुणाचे ऑप्शन पटत नव्हते. बस अणि इथे यात आमचे मामू चा मेल आला अणि म्हणाले, "यन्ना रास्कला, हम सब साथमे कहिभी जाये तो भी एन्जॉय कर सकते है, माईंड ईट." - हिट डायलॉग.
अणि मग त्यानंतर १-२ जनांच्या आड़मुठेपनानंतर ठरल की सर्व बिचवर जातोय. ओके. बट परत आता तीच भानगड - कुठले बिच? झाल परत चेन मेल ला सुरुवात झाली. काशिदपासून हरीहरेश्वर पर्यंत, गुहागरपासून गणपतीपुळेपर्यंत, तारकर्ली ते गोवा अशी सर्व बिचेस पार लोकानी धुन्डाळुन टाकली. गूगल अणि जी-म्याप हे किती फायदेशीर आहे याचा प्रत्ययच मला त्या दिवशी आला. पोरांनी अक्खी बिचची माहितीच पुरवायला सुरुवात केली. त्यातही एक जन म्हणाला, आपल्याला वीकएंडला जायच आहे म्हणजे २ च दिवसांची सुट्टी, कुठले जवळच बिच बघा. झाल गल्लीत गोंधळ अणि दिल्लीत मुजरा, एक तर बिच फायनल होत नव्हत अणि हे कार्ट दिवस कमी च्या नावाखाली बोम्ब मारयाला लागल. परत नाटके सुरु झालीत.
हा असा Re / Fw चा  चेन मेल खेळ जवळपास ३-४ दिवस चालला. वाटायला लागल होता की कम्पनी च्या मेल सर्वर च काही खर नाही, असाच जर सुरु राहिल तर सिस्टम ग्रुपवाले येउन वाट लावतील. सुदैवाने असा काही विपरीत झाल नाही. ५ व्या दिवशी मोटा म्हणला,  आपण सर्व नागांव बिचला जाऊ, हे अलीबाग च्या जवळ आहे. नागांव बिच ला आपल्या ओळखीचं एक जन आहे, त्यामुळे तिथे आपल्याला रहायला रूम्स मिळतील. १-२ तास कुणाचाच मेलला रिप्लाय नाही. ३ ऱ्या तासाला मामुचा रिप्लाय आला, की वेरी गुड, हे जवळ पण आहे अणि ओळखीचं पण आहे, अणि मेन म्हणजे येथे आपण सर्व बाइक ने जाऊ शकतो.
बास...बाइक च नाव काढला अणि पोरांमधला Rodies जागा झाला.   ठरल.
आम्ही सर्व नागांव ला चाललो होतो. १९ फेब ही तारीख पण निश्चित झाली.

पहाटे लवकर निघायच आहे म्हणून, आदल्या संध्याकाळी सर्व मंडळी आमच्या रूम वर जमा झाली. त्या 
रात्रीला, उद्या बिच वर जाउन काय करायचे सर्व ठरल, इतक की कोणत्या रंगाची चड्डी घालायची हे सुद्धा :)  पोर एवढी एक्साईट झाली होती की झोपायला कुणी तैयारच नव्हत, अणि त्यात कुणी सुचवला कुणास ठाउक पोरांनी पत्ते खेळायला सुरुवात केली.(बर झाल होता की कुणी दारु आणली नव्हती, नाहीतर रात्रीचा रंग काही औरच राहिला असता)   रात्रीच्या एक-दिड पर्यंत मंडळी चांगलेच खेळायला लागली होती. तेवढ्यात मामू म्हणले की वाजायला आलेत झोपा. सकाळी चा अलार्म लावून सर्व झोपलो.

पल्सर
सकाळी ला काय घडल हे मी आधीच सांगीतल.
तयारी करून निघेपर्यंत पहाटेचे :३० झाले होते.
पार्किंग मधे येउन पल्सर गेट च्या बाहेर काढल्या.
त्या आवाजाने वॉचमन उठला.
पल्सरच्या हेडलाईटच्या प्रखर प्रकाशात आता
सोसायटी मधला रस्ता चमकायला लागला होता.
"गणपती बाप्पा मोरया" म्हणालो, अणि पहिला गियर टाकला....... Lets Do It....

( क्रमश: )
-----------

भाग २ वाचन्याकरीता येथे click करा.  

Sunday, April 17, 2011

अतिरेक...उद्वेग..भावना अणि एक उड़ान

बार मधे बसून चौघांना ही जास्त चढलेली आहे. ३ सिनिअर्स अणि १ जूनियर.
त्यापैकी १ सिनिअर जूनियर ला विचारतो, "तेरा ड्रीम बिसनेस क्या है बे?" जूनियर- "मुझे राईटर बनना है."
सिनिअर्स - "राईटर... हा हा हा हा... जावेद अख्तर.. हा हा हा....अछ्छा कुछ सुना.."
जूनियर -
हर बाल की खाल की ये छाल भी खा जाये,
इस के हाथ पर जाये तो महीने साल भी खा जाये,
किसी बेहाल का जो बचा हो हाल तो हाल भी खा जाये,
बे-मौत मरते मन का ये मलाल खा जाये,
लालू का लाल खा जाये, नक्सलबारी की नाल खा जाये,
बचपन का धमाल खा जाये, बुढ़ापे की शाल भी खा जाये,
हया तो छोड़ो बेहया की चाल भी खा जाये
और अगर परोसा जा सके तो खयाल  भी खा जाये...
मागच्या १०-१२ दिवसांपासून, निखिल माझ्या मागे लागला होता की, "साले उड़ान देख, अल्टि मूवी है, ये नहीं देखा तो क्या देखा". खरे तर त्याने एवढ सांगितल्यावरच मी मूवी बघायला पाहिजे होती, (कारन तो मला ज्या मूवीज सज्जेस्ट करतो, त्या सर्वच छान असतात) पण का कुणास ठाउक मी टाळाटाळ करत होतो, हे माहित असून सुद्धा की २०११ चे फिल्मफेअर अवार्ड्स या मूवी ला मिळाले. यात बेस्ट फिल्म (क्रिटिक्स अवार्ड), बेस्ट स्टोरी,  सिनेमाटोग्राफी, स्क्रीनप्ले, बेस्ट ब्याकग्राउंड म्यूजिक, अणि बेस्ट साउंड डिजाईन, बेस्ट मेल सपोर्टिंग एक्टर असे सात पुरस्कार आहेत. हे एवढा माहित असून सुद्धा माझा काही मूवी बघण्याचा योग येत नव्हता, अणि त्यानंतर निखिल ने वर लिहिलेली कविता ऐकवली अणि मी म्हटल बास आता "उड़ान" घ्यायची.

           जेव्हा मुले मोठी व्हायला लागतात, त्याना कंठ फुटायला लागतो (म्हणजे सर्वानाच फुटतो, त्यात नविन असे काही नाही), त्याना त्यांच वेगळं अस व्यक्तित्व जाणवायला लागत. पालकांच्या इछा, आकांक्षा हे एक त्यांच्यावर अतिरेक आहे अस वाटायला लागत( नेहमी असेच असत असे नाही). त्यावेळेस ती बंड करून उठतात अणि आपल्या सर्वाना हे सत्य नाकारून चालणार नाही  की पिढ्या नि पिढ्यापासून हा प्रोब्लेम सुरूच आहे. असो मुद्दा असा आहे की आपल्या आयुष्यात आपल्या सर्वाना एकदा तरी आपली इच्छेविरुद्ध कुणाच्या समोर वाकाव लागत, मग ते कधी आपले सिनिअर्स असतात, कधी बॉस, कधी नातेवाईक, तर कधी आणखी कुणी. उड़ान आपल्याला मुलगा अणि शिस्तेचा अतिरेक झालेले वडिल यांच्यातील समंद्धाबद्दल सांगते, अणि सोबतच एक प्रेरणा देते की आयुष्यातील ही सर्व बंधने झुगारून तुम्ही मुक्तपणे आपल्याला जे आवडते ते करू शकता.

          शिमला च्या एका अति चांगल्या शाळेच्या हॉस्टल पासून मूवी ला सुरुवात होते. चार तरुण मुले(मित्र) जेमतेम मिसरुड फुटलेली, होस्टल ची भिंत ओलांडून अडल्ट पिक्चर बघायला जातात अणि तिथेच वार्डन चौघाना पकडतो. प्रिंसिपल चौघाना एक्सपेल करून घरी पाठवून देतो. यादरम्यान विशेषता कॉलेज तरुणांना आवडतील असे काही संवाद आहेत अणि जे ऐकून तुम्हाला ही तुमचे कॉलेज दिवस नक्की आठवतील.

           रोहन (रजत बारमेचा) हा त्या चौघांपैकी एक. एक्सपेल झाल्यावर, वार्डन रोहनला त्याचे वडिल रोनित रॉय कड़े जमशेदपुरला आणून सोडतो. घरी आल्यावर रोहन ला कळत की त्याचा एक सावत्र लहान भाऊ (अर्जुन) पण आहे. अणि हे तिघे पुरुष एकाच घरात एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असतात. रोनित रॉय हा मिलिट्री-सदृश अतिशय शिस्त-प्रिय अस व्यक्तिमत्व आहे. ते रोहन ला त्याच्या इच्छेविरुद्ध  पार्ट टाइम इंजीनियरिंग अणि पार्ट टाइम त्याच्या मेटल फैक्ट्रीत जबरदस्तीने काम करायला लावतात. अर्जुन जो की फ़क्त ६-७ वर्षाचा आहे, त्याला अभ्यासाची अति सक्ती करतो. आपल्याला पापा न म्हणता 'सर' म्हणावे ही विचित्र मागणी, अणि त्याला दिलेल कारन ही तेवढच तिरपट. त्याच्या ह्या विचित्र अणि शिस्त-प्रिय वागन्यामुळे दोन सावत्र भाऊ, ज्यांचे आधी पटत नसते, ते मात्र जवळ येतात.


छोटी छोटी छितराई यादें
बिछी हुई हैं लम्हों की लॉन पर.
नंगे पैर उनपर चलते-चलते
इतनी दूर चले आये
की अब भूल गए हैं – जूते कहाँ उतारे थे. एडी कोमल थी, जब आये थे.
थोड़ी सी नाज़ुक है अभी भी.
और नाज़ुक ही रहेगी
इन खट्टी-मीठी यादों की शरारत
जब तक इन्हें गुदगुदाती रहे.
सच, भूल गए हैं, की जूते कहाँ उतारे थे.
पर लगता है,
अब उनकी ज़रुरत नहीं.

मधल्या काळात रोहन चे त्याच्या मित्रांशी फोनवर चोरून बोलन होत असत, तेव्हा त्याला कळत की त्याच्या बाकी ३ मित्रानी मुंबईत एक होटल सुरु केले आहे, अणि सर्वे तिथे काम करून मजेत आहे. ते रोहनला पण मुंबईला ये म्हणतात. रोहन आपल्या भावना मनात लपवत जगत असतो, एके दिवशी अर्जुन अचानकपने हॉस्पिटलला अड्मिट होतो. अर्जुनला हॉस्पिटलला सोडून, रोनित रॉय काही कामानिमीत्त कोलकत्ता ला जातो. इकडे रोहन आपल्या कवितांनी अणि गोष्टीनी सर्व डॉक्टर, नर्सेस अणि पेशंट्सची मने जिंकतो. कोलकत्ता हुन परत आल्यावर रोनित रॉय ला कळते की रोहन इंजीनियरिंग ला नापास झाला आहे. त्या रात्रि मुलगा अणि वडिल यांच्यातील बाचाबाची, प्रश्ने, उत्तर-प्रतिउत्तर. ह्या सिन्स नि मूवी चा टेम्पो हाई नेला आहे.

         रोनित रॉय नि साकारलेला अतिशय शिस्त-प्रिय बाप अप्रतिम. रोनित रॉयने एक बापाबरोबरच, बायको नसलेल्या एकट्या पुरुषाच क्यारेक्टरही छान दाखविला आहे. रोहन (रजत बारमेचा) ही तोडीस-तोड़, बऱ्याच गोष्टी तो त्याच्या डोळ्यातून बोलला आहे. लहान अर्जुन (आयान बरोदिया) ही उत्तम, त्याला सांगितलेल त्याने उत्तम पार पाडल आहे. राम कपूर ने साकारलेला काका ही उत्तम.  मूवीमधे सिनिअर्स सोबतच "मोटू मास्टर" हे गाने ही अप्रतिम - हसून हसून पोट दुखाव अस. डिरेक्टर ची क्रिएटीविटी ही उत्तम, त्याने जमशेदपुर ला उत्तम रित्या दाखविले आहे. बेस्ट सिनेमाटोग्राफी मिळालाय हे कही उगाच नव्हे, रोहन च्या भावना टीपने, त्याचे स्टील फैक्ट्रीच्या बाहेर असलेले सिन्स, रेलवे जवळचे सिन्स, ताण सहन न झाल्यामुले, त्याचा उद्वेग, राग गाडीवर काढलेले सीन अणि बरेच इतर.

           त्या रात्रीनंतर, पुढे काय घडत, रोहन, अर्जुन अणि त्यांचे वडिल रोनित रॉय यांचे पुढे काय होते, हे माहित करून घेण्यासाठी तर उड़ान बघायला हवा. बंधने ही आयुष्यात येणारच, ती कशी पेलायची, किंवा ती कशी झुगारून लावायची, हे आपल आपल्यालाच ठरवाव लागत. कारन या सर्वांचा सामना हा आपल्याला स्वताहालाच करायचा असतो. थोडक्यात ही न चुकवावी अशी एक "उड़ान" आहे. 
कहानी ख़तम है, या शुरवात होने को है,
सुबह नई है ये, या फिर रात होने को है.