निदान प्रत्येकाला कुठल्यातरी गोष्टीचे व्यसन असते, ही बाब मला जरा खट्कायला लागली होती. पण जेव्हा जेव्हा मुंबई चा विषय निघतो, काय कुणास ठाउक मी सुद्धा त्यात सामिल होउन त्यांच्या गोष्टी ऐकेपासून ते माझ्या गोष्टी सांगत पर्यंत सुटतो, अगदी व्यसनाच्या आहारी गेलेल्यासारखा :)
मुंबई अणि मुंबईकर - एक व्यसन अणि एक व्यसनाच्या आहारी गेलेला. कुणाला नौकरीच, कुणाला छोकरीच, अणि कुणाला आणखी कशाच. आधी जेव्हा ह्या अश्या मुंबई बद्दल ऐकायचो तेव्हा गम्मत वाटायची. लोक कुठल्याही गोष्टीचा उहापोह करतात असच वाटायच. अणि परत एक मुंबईकर अशीच त्याची टिंगल उडवायचो. पण मुंबई काय चीज आहे, हे मुंबईला गेल्यावरच कळत. अणि मुंबईला राहून एखादा मुंबईच्या प्रेमात नहीं पडला असा विरळाच.
मुंबई अणि मुंबईकर - एक व्यसन अणि एक व्यसनाच्या आहारी गेलेला. कुणाला नौकरीच, कुणाला छोकरीच, अणि कुणाला आणखी कशाच. आधी जेव्हा ह्या अश्या मुंबई बद्दल ऐकायचो तेव्हा गम्मत वाटायची. लोक कुठल्याही गोष्टीचा उहापोह करतात असच वाटायच. अणि परत एक मुंबईकर अशीच त्याची टिंगल उडवायचो. पण मुंबई काय चीज आहे, हे मुंबईला गेल्यावरच कळत. अणि मुंबईला राहून एखादा मुंबईच्या प्रेमात नहीं पडला असा विरळाच.
मुंबई अणि माझ नात हे लहानपनापासूनच. मी लहान, दुसर्या वर्गात. म्हणजे जेमतेम ६-७ वर्षाचा. आई - बाबा सोबत मुंबई ची पहिलीच भेट. समुद्र हा पहिल्यांदा बघितला तोही मुंबईतच. हाजीअलीचा तो जादुमय रस्ता. भरती-ओहोटी हे प्रकार लहान असल्यामुळे कळत नव्हते. अणि त्यामुळेच त्या गायब होणार्या रस्त्याची मजा कही औरच वाटत होती. त्या रस्त्यावरच समुद्राच्या पाण्याची चव पण चाखायला मिळाली. रस्ता ओला असल्यामुळे निसरडा झाला होता, अणि मुहूर्त साधला गेला, माझा पाय घसरला अणि मी अर्धा पाण्यात, हो चक्क पाण्यात. बाबांनी हात घट्ट पकडल्यामुळे थोडक्यात निभावल, म्हणजे माझी आवडती चप्पल गेली. समुद्राच पानी हे खारट असते हे पहिल्यांदा तिथे कळालं. त्यानंतर जुहू बिच, प्लानेटोरियम, गेटवे ऑफ़ इंडिया....अशी बरीच ठिकान बघितली. अणि बस वाटलं की हीच मुंबई. त्यानंतर अस कधी मुंबई अणि मुंबई कधी विषय नाही. अणि सोबत अभ्यास एके अभ्यास करत राहिल्यामुळेच मुंबई च विसर पडला.
पण ते असता ना, दुनिया गोल है म्हणतात ते काही उगाच नाही. १८ वर्षानंतर इंजीनियरिंगच्या शेवटच्या सरत्या वर्षाला मुंबई ने बोलावन धाडलं. एक आईटी कंपनीत सिलेक्शन झाला, अणि वाटलं मुंबई मी परत एकदा येतो. अणि कुणास ठाउक कुठे माशी शिंकली, मुंबई च पुणे कधी झाल कळालच नाही. आलो पुण्यात. पण संधि परत एकदा हळूच आली. ट्रेनिंग म्हणून आम्हाला मुंबईला पाठविन्यात आल.
तेव्हाची मुंबई अणि या मुंबईत आता फरक जाणवायला लागला होता. तेव्हा मुंबई फ़क्त एक गर्दी वाटत होती अणि आता तीच मुंबई गर्दीतही उठून वेगळी दिसत होती. तेव्हा मुंबई अल्लड होती अणि आता ती तरुण झाली होती. मुंबईतली तरुनाई आकर्षित करायला लागली होती. याच मुंबईने ट्रेनिंगला आल्यावर काही अप्रतिम दिवस दाखविलेत. मित्र-मैत्रिणीसोबत मुम्बई भटकलो. मुंबईची रात्र बघितली अणि मुंबईची सकाळही. बेस्ट अणि लोकल ही.
ट्रेनिंग आटोपून पुण्यात परतलो, अणि त्यानंतर मुंबईची एक नियमित अंतराने का होइना वारी करण्याचा नादच लागला. या प्रत्येक वारीत मी मुंबईची विविध रुपे बघितली. कधी तीन हात नाका तर कधी पवई. कधी नातेवाईक तर कधी मित्र. कधी कुणाला भेटण्यासाठी तर कधी फ़क्त बैंडस्टैंड . कधी सिद्धीविनायक तर कधी जीरो ड़ीग्रीज. कधी वाशी तर कधी मरीन ड्राईव्ह. कधी दादर तर कधी नायपाडा. न संपणारी मुंबई. मुंबईच्या आसपास ट्रेक करयाचा असेल तर बदलापुर अणि ठाणे ही आमची मुंबईतिल हक्काची ठिकाने. अणि म्हनुनच मुबई आजू-बाजू परिसरातले ट्रेक पण झालेत.
ट्रेक झालेत, मुंबई पण बघितली, पण अजुनही मनात एक हुरहुर लागलेलीच असते. मुंबई बघितली पण मुंबई जगलो असा कधी वाटतच नाही. ही मुम्बई म्हणजे दर्शनीय मुंबई आहे असे मला नेहमी वाटते. मला वाटते खरी मुंबई ही वीकडेस ला सकाळी ७ ची लोकल ला अणि संध्याकाळी ६ च्या लोकल ला सापडते. कामाला जाणारे अणि परतनारे मुंबईकर, ती गर्दी, तो लोकांच सहवास, प्रत्येकाची इच्छित स्थली उतरण्याची धडपड. रात्रीला कामावरून उशिरा परतनारे, रात्रि उशीर झाला तरी आता घरी जायला ऑटो मिळेल काय याची चिंता नसणारे, स्टेशन पासून पायीच जात, आपल्या प्रियजनासोबत मोबाइल वर बोलत जाणारे. रूम / घरी पोहचून स्वयंपाक / जेवण करून मग झोपी जाणारे अणि तेवढ्याच उर्मिने सकाळी ६ ची लोकल पकड्नारे. वीकएंडला मस्तिचा प्लान करने. अक्खा वीकएंड मस्तपैकी एन्जॉय करने. हे सर्व फ़क्त मुंबईतच होऊ शकते. मुंबईची हवेतच ही खासियत आहे की मानुस न थकता अखंडपने काम करत असतो. मला हे सर्व करायच आहे, मला हे सर्व अनुभवायच आहे. मला जिवाची मुम्बई करायची आहे. मुंबई हे एक व्यसन आहे.
मला मुंबई जगायची आहे...
प्रश्न : मुंबई जगायची असेल तर मुंबईकर तर व्हावे लागणार नाही ना... ? :) :) :)